Goa Election:निकालापूर्वीच कॉग्रेसने सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची वेळ मागितली..

कॉग्रेसने नवनिर्वाचित आमदारांना एका रिसोर्टमध्ये ठेवण्याची तयारी केली आहे. भाजपने आपल्या कार्यालय परिसरातील मंदिरात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मतमोजणीपूर्वी पूजा केली .
Goa Election:निकालापूर्वीच कॉग्रेसने सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची वेळ मागितली..

पणजी : गोव्याच्या विधानसभेच्या (goa election 2022) निवडणुकीच्या मतमोजणीस सुरवात झाली आहे. निकालापूर्वी कॅाग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांची वेळ घेतली आहे. नवनिर्वाचित आमदारांना एका रिसोर्टमध्ये ठेवण्याची तयारी केली आहे. भाजपने आपल्या कार्यालय परिसरातील मंदिरात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मतमोजणीपूर्वी पूजा केली .

देशभरातील पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं गोव्याच्या निवडणुकीकडं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. छोटंसं राज्य असलं तरी याठिकाणी या निवडणुकीत असलेली समीकरणं ही अत्यंत रंजक आहेत.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजप आणि काँग्रेस यांचे उमेदवार जास्त निवडून येतील आणि अपक्ष किंवा इतर पक्षांच्या मदतीनं सत्ता काबीज करता येईल, असा अंदाज आहे. गोव्यात सत्ता कुणाला मिळणार हे सांगता येणार नाही. कारण गोवेकर कोणता विचार करून मतदान करेल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे.

गोव्याच्या राजकारणात डोकावल्यास ही चौदावी विधानसभा निवडणूक. यापूर्वी झालेल्या तेरा विधानसभा निवडणुकीत केवळ सहा वेळाच पूर्णबहुमत मिळालेलं आहे. सध्या असलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजप आणि काँग्रेस यांचे उमेदवार जास्त निवडून येतील आणि अपक्ष किंवा इतर पक्षांच्या मदतीनं सत्ता काबीज करता येईल, असा अंदाज आहे.

काँग्रेसचे पारडं जड असल्याचे काही पोल्समध्ये दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसने हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपविरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करत काँग्रेस गोव्यात आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस सोबत युती करण्यास तयार आहे.

Goa Election:निकालापूर्वीच कॉग्रेसने सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची वेळ मागितली..
Uttarakhand :भाजप अन् कॉग्रेसमध्ये ३६ चा आकडा ; कोण होणार मुख्यमंत्री?

निवडणुकीच्या निकालापूर्वी प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांची ही बैठक जवळपास 30 मिनिटे चालली. सावंत यांनी एक्झिट पोलनंतरच्या राजकीय परिस्थितीवर पंतप्रधानांशी चर्चा केली, असे सांगण्यात येत आहे.

गोव्यात ४० विधानसभा मतदारसंघ आहेत. यापूर्वी २०१७च्या गोवा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला थेट बहुमत मिळाले नव्हते. काँग्रेसला एकूण १७ जागा मिळाल्या होत्या. पण प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांच्या साथीने भाजपचा सत्तेचा दावा केला. केंद्रातून परत येत मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पर्रीकरांच्या निधनानंतर गोव्यातले चित्र बदलले. प्रमोद सावंत पर्रीकरांनंतर गोव्याचे मुख्यमंत्री झाले.

निवडणुका जरी स्थानिक मुद्यांवर लढवल्या जात असल्या, गोव्याच्या अस्मितेचा मुद्दा चर्चेत असतो. स्थानिक राजकारणात राष्ट्रीय पक्षांचं वर्चस्व दिसून आले आहे. स्थानिकांचे प्रश्न, सरकारी नोकरी आणि आश्वासनांचा पाऊस यावेळी गोव्यात पाहायाला मिळालं.

सत्तेसाठी २१ जागांची आवश्यकता असते. त्यामुळे भाजपनं तर 2022 मध्ये 22 असा नारा दिला. काँग्रेस, तृणमुल काँग्रेसनं देखील आश्वासनांची खैरात केली. आपनं तर दिल्ली मॉडेलचा प्रचार केला. पण, असं असलं तरी गोव्यात सत्ता कुणाला मिळणार हे सांगता येणार नाही. कारण गोवेकर कोणता विचार करून मतदान करेल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे.

Goa Election:निकालापूर्वीच कॉग्रेसने सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची वेळ मागितली..
दाऊदचा राजीनामा घेण्यासाठी जमलात, त्याबद्दल आभार ; दरेकरांना मलिकांचा विसर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com