काँग्रेसला धक्का; दोन महिन्यांपूर्वीच शिवसेनेतून आलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

राखी प्रभूदेसाई नाईक यांच्या निर्णयामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे.
Rakhi Prabhudesai Naik

Rakhi Prabhudesai Naik

Sarkarnama

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. नेत्यांच्या फोडाफोडीचे राजकारण (Politics) जोरात सुरू असून त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला (Congress) बसताना बसत आहे. एकामागून एक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. आता गोवा (Goa) प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या राखी प्रभूदेसाई नाईक (Rakhi Prabhudesai Naik) यांनी बुधवारी पक्षाला रामराम ठोकला.

फेब्रुवारी महिन्यात गोव्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसकडून काही जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली आहे. पण नेत्यांचे राजीनामासत्र अद्याप थांबलेले नाही. दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेतून (Shiv Sena) काँग्रेसमध्ये दाखल झाले राखी नाईक यांनी बुधवारी पक्ष सोडला. त्यांनी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला.

<div class="paragraphs"><p>Rakhi Prabhudesai Naik</p></div>
पंतप्रधान मोदींची सभा रिकाम्या खुर्च्यांमुळे करावी लागली रद्द!

नाईक यांनी बुधवारीच खासदार महुआ मोईत्रा यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाईक यांनी आपण अत्यंत जड अंत:करणाने पक्ष सोडत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे. काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व दिशाहीन आहे. येथील नेते प्रियांका गांधी यांच्यासारख्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या विचारांच्या विराधात काम करत आहेत, असं नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) जाण्याचे कारण सांगताना नाईक म्हणाल्या, गोव्यात भाजपाला राजकीय पर्याय म्हणून केवळ तृणमूल काँग्रेसच ठरू शकते. त्यामुळे या पक्षात सामील झाल्याचे नाईक यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, तृणमूल काँग्रेससह आपनेही गोव्यात यंदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविकास आघाडीची चाचपणी

गोव्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी तयार करण्याच्या हालचाली सुरू आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच गोव्याचा दौरा करत तसे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात या तीनही पक्षांनी एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं आहे. आता हीच आघाडी गोव्यातही करण्याची चाचपणी सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com