गोव्यात भाजपला झटका; बड्या नेत्याचा मंत्रिपदासह आमदारकीचाही तडकाफडकी राजीनामा

मागील पंचवीस दिवसांत भाजपला हा तिसरा मोठा झटका बसला आहे. काही दिवसांपूर्वीच एका आमदारने पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.
Michael Lobo
Michael LoboSarkarnama

पणजी : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोनच दिवसांत गोवा भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या बड्या नेत्यानं मंत्रिपदासह आमदारकीचाही0 तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ते भाजपला रामराम ठोकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील पंचवीस दिवसांत भाजपला हा तिसरा मोठा झटका बसला आहे. काही दिवसांपूर्वीच एका आमदारने पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून आमदारांनीही निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. पण या धामधुमीत भाजपला धक्का बसला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि घनकचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

Michael Lobo
भाजप आमदाराची स्टंटबाजी; राजीनामा लिहिला पण विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहचलाच नाही!

मायकल लोबो (Michael Lobo) यांचा उत्तर गोव्यात मोठा दबदबा असल्याचे मानले जाते. त्यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. लोबो यांच्यासोबत रेईस मागोस हे नेतेही भाजपला रामराम करण्याची शक्यता आहे. लोबो हे कलंगुट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. तर मागोस यांना सलीगांव मतदारसंघातून उमेदवारी अपेक्षित आहे. लोबो यांनी अद्याप कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट केलेलं नाही.

राजीनामा दिल्यानंतर लोबो म्हणाले, मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कलंकुट मतदारसंघातील मतदार माझ्या निर्णयाचा आदर करतील, अशी आशा आहे. मी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. इतर राजकीय पक्षांसोबत माझी चर्चा सुरू आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. मी पक्षांतर्गत कारणांमुळे नाराज होतो. तसेच पक्षाचे कार्यकर्तेही निराश झाले होते, असं लोबो यांनी सांगितले.

दरम्यान, गोव्याचे (Goa) नगर विकास मंत्री आणि भाजपचे आमदार मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी मागील महिन्यातच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या सेक्स स्कँडलमध्ये (Sex Scandle) सहभागी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने (Congress) केला होता. त्यानंतर अलीना सलडान्हा (Alina Saldanha) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करत उमेदवारीही मिळवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in