Urfi Javed-Chitra Wagh Controversy:
Urfi Javed-Chitra Wagh Controversy:

Urfi Javed-Chitra Wagh Controversy: 'जा आधी हिंदू संस्कृती शिकून घ्या' ; उर्फीनं वाघांना डिवचलं...

भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे

Urfi Javed-Chitra Wagh Controversy : भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed)यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. उर्फी सुधारल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असा पवित्राच चित्रा वाघ यांनी घेतला आहे. तर दुसरीकडे उर्फीनेही थेट हिंदू संस्कृतीचा उल्लेख करत चित्रा वाघ यांना सुनावलं आहे.

Urfi Javed-Chitra Wagh Controversy:
Urfi Javed-Chitra Wagh Controversy : उर्फी जावेद-चित्रा वाघ वादाबाबत मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

यावेळी उर्फीने ट्विट करत चित्रा वाघांवर निशाणा साधला आहे. एकीकडे त्यांना हिंदु राष्ट्र हवे आहे, तर दुसरीकडे महिलांच्या कपड्यांवर तालिबानी नियम लागू करायचे आहेत. हिंदू धर्म हा सर्वात प्राचीन धर्म आहे, हिंदू धर्मात स्त्रियांना कायम स्वातंत्र्य दिले आहे. त्यांचा आदर करण्यात आला आहे. मग हे कुठल्या संस्कृतीबद्दल बोलत आहेत? असा सवाल उर्फीने विचारला आहे.

तसेच, ', बलात्कार, डान्सबार, महिलांना तिच्या कपड्यांमुळे मारण्याची उघडपणे धमकी देणे, या गोष्टी आपल्या भारतीय संस्कृतीत येत नाहीत . असे सांगत उर्फीने इतिहासकालीन काही मुर्त्यांचे फोटोही शेअर केले आहेत. प्राचीन हिंदू स्त्रिया अशाप्रकारे पेहराव करत असत. प्राचीन हिंदू उदारमतवादी होते, शिक्षित होते, स्त्रियांना त्यांचे कपडे निवडण्याची मुभा होती, खेळ, राजकारणात सहभाग घेण्याचा त्यांना अधिकार होता. ते लिंग आणि स्त्री शरीर सकारात्मक लोक होते. असे ट्विट करत जा आणि आधी भारतीय संस्कृती काय आहे ते शिकून घ्या, असा सल्लाही उर्फीने चित्रा वाघांना दिला आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी काल उर्फीविरोधात तक्रार दाखल करत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.त्यानंतर पोलिसांनीही तिची चौकशी केली. तर उर्फीनेही शुक्रवारी महिला आयोगाकडे धाव घेत अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची भेट घेतली होती. उर्फी जावेदला सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. तिच्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तिने सुरक्षेची मागणी केली आहे. तसेच ज्या लोकांकडून तिला वारंवार त्रास दिला जातोय त्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई व्हावी अशीही मागणी तिने महिला आयोगाकडे केल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तिला सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in