विरोधी पक्षातील व्यक्तींना पशु-पक्ष्यांची नावे देणे ही भाजपचीच संस्कृती... 

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना पक्ष्यांची उपमा देत आहेत. यावरुन त्यांची सवय आणि संस्कृती समोर येत असल्याचा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.
विरोधी पक्षातील व्यक्तींना पशु-पक्ष्यांची नावे देणे ही भाजपचीच संस्कृती... 
Giving names of animals and birds to the people of the Opposition is the culture of BJP ...

मुंबई : विरोधी पक्षातील राजकीय व्यक्तींना पशु-पक्ष्यांची नावे देणे ही भाजपचीच संस्कृती आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. Giving names of animals and birds to the people of the Opposition is the culture of BJP ...


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना पक्ष्यांची उपमा दिली असून भाजपच्या या कृतीला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. 


भाजपचे अमित शहा विरोधी पक्षांच्या लोकांना साप, विंचू, तर कधी कुत्रा बोलत आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना पक्ष्यांची उपमा देत आहेत. यावरुन त्यांची सवय आणि संस्कृती समोर येत असल्याचा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

Related Stories

No stories found.