Raj Thackeray : ''एकदा हातात सत्ता द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेन''

Raj Thackeray Speech Live Updates : ''सरकार कोर्टाकडे बघतंय, असं कोर्टाकडे पाहून सरकार चालत नाही''
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama

Mumbai : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज मुबंई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी मनसैनिकांना संबोधित केलं. या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच एकदा राज्याची सत्ता हातात देण्याचे आवाहनही केलं आहे.

''महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली आहे. आज महाराष्ट्र चाचपडत आहे. आज हे गेले, उद्या ते गेले, अशी परिस्थिती सुरू आहे. कोणत्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्र पाहत आहे? सरकार कोर्टाकडे बघतंय, असं कोर्टाकडे पाहून सरकार चालत नाही. आत्ताच विधानसभा निवडणुका लावा जे व्हायचं ते होऊन जाऊदेत. एकदा हातात सत्ता द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेन'', असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Raj Thackeray
Raj Thackeray : राणेंनी कधीच पक्ष सोडला नसता पण....; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' प्रसंग!

ठाकरे पुढे म्हणाले,''उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकीत भाजपबरोबर युती केली. मात्र, निकालानंतर म्हणाले अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्या. मग तुम्ही निकालानंतर का म्हणता? प्रचारावेळी तुम्ही का सांगितलं नाही. ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं त्या लोकांनी काय करायचं? ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं? राजकारणात काय चाललंय?'', असा सवालही यावेळी त्यांनी केला.

Raj Thackeray
Raj Thackeray : ''आत्ताच विधानसभेच्या निवडणुका लावा अन् काय ते एकदाच होऊन जाऊ द्या''

''एकनाथ शिंदे हे सुरतला गेले. सध्या शिवसेनेचं काय झालं? हे महाराष्ट्र पाहत आहे, पण हे बाळासाहेब ठाकरे असते तर हे घडलं नसतं. बाळासाहेबांशिवाय कोणालाही शिवधनुष्यबाण झेपणार नाही. एकाला झेपलं नाही आणि दुसऱ्या झेपेल की नाही माहित नाही'', असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना नाव न घेता लगावला.

तसेच ''उद्धव ठाकरे हे सभा घेत आहेत तिकडे सभा घेत बसू नका. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तर राज्यासाठी काम करा, असा सल्लाही एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com