फडणवीस जवाब दो..! राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात सुप्रिया सुळेंचा सवाल

bhagatsingh koshayri| गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे.
 अजून किती आत्महत्यांची वाट पाहणार? : सुप्रिया सुळे 
अजून किती आत्महत्यांची वाट पाहणार? : सुप्रिया सुळे 

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनेकदा राज्यातील महापुरुषांचा अपमान केला आहे. आता महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यांच्याकडून सातत्याने अपमानस्पद वक्तव्ये होत आहेत. महाराष्ट्राविरोधात बोलून कट कारस्थान करायचे, असं त्यांचं सुरु आहे. सोमवारी (१ ऑगस्ट) मी संसदेत हा मुद्दा उपस्थित करणार आहे. राज्यापालांचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांना केंद्रात परत बोलवून घ्या, अशी मागणी मी संसदेत करणार आहे. जो माणूस महाराष्ट्र अपमान करतो त्याबद्दल राष्ट्रपती यांनी निर्णय घ्यावा, असही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना, गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. या वक्तव्याने राज्यातील राजकारण वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वसामान्य माणसापासून विरोधकही राज्यापालांच्या विरोधात आक्रमक झाले आहे.

 अजून किती आत्महत्यांची वाट पाहणार? : सुप्रिया सुळे 
राज्यपालांविरोधात विरोधक आक्रमक; माफी मागा नाहीतर...

माझी मुख्यमंत्र्यांकडे विनंती आहे की ते जिथे असतील तिथून त्यांनी प्रेसिडेंट ऑफ इंडियाला टॅग करुन राज्यपालांची तक्रार केली पाहिजे. मुख्यमंत्री शिंदेंनी राज्यपालांचे हे प्रकरण तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींच्या कानावर घालावं. पत्र वगैरे लिहिण्याची गरज नाही. तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे. ते जिथे असतील तिथून तातडीने ट्वीट करावं आणि राज्यपालांच्या वक्तव्याबद्दल पंतप्रधानांना माहिती द्यावी. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि राज्यपाल असंवेदनशील आहेत. ते सतत महाराष्ट्राचा द्वेष करतात. महाराष्ट्राच्या विरोधात बोलतात. त्यामुळे ते जिथे असतील तिथून त्यांनी राज्यपालांच्या विरोधात अॅक्शन घेतली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. आता फडणवीसांनीही याचं उत्तर दिलं पाहिजे. राज्यपालांची ही भूमिका पटते का हे त्यांनी स्पष्ट करावे, फडणवीसही राज्यपालांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतील ही अपेक्षा आहे. देवेंद्र जी जवाब दो, हे राजकीय प्रश्न नाहीत, हा महाराष्ट्र अपमान आहे, महाराष्ट्राबद्दल मनात असलेला द्वेष त्यांच्या वागण्यातून दिसतो आता तुम्हीच राष्ट्रपतींना राज्यपालांना परत पाठवण्याची विनंती करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com