रणनिती ठरलीय, छातीठोकपणे सांगतो; धनंजय महाडिकच विजयी होणार : गिरीश महाजन

Dhananjay Mahadik | Girish Mahajan : धनजंय महाडिकांच्या विजयासाठी गिरीश महाजन मैदानात
रणनिती ठरलीय, छातीठोकपणे सांगतो; धनंजय महाडिकच विजयी होणार : गिरीश महाजन
Dhananjay Mahadik News | Girish Mahajan News, Jalgaon News, Rajysabh Election 2022 News UpdatesSarkarnama

जळगाव : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) पराभव समोर दिसत असल्याने ते बिथरले आहेत, त्यामुळे त्यांची हॉटेल टू हॉटेल धावपळ सुरू आहे. आमची रणनीती पक्की झाली असून कोणत्याही परिस्थितीत आमचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी होणारच हे आपण खात्रीशीर सांगत आहोत, असे भाजप (BJP) नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. (Girish Mahajan News)

राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा तिसरा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने तिघांवर सोपविली आहे. यात माजी मंत्री गिरीश महाजन यांचा समावेश आहे. यासाठी महाजन यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लहान पक्ष व काही अपक्ष आमदार आमच्या सोबत आहेत, आमच्याकडे तिसरा उमेदवार जिंकण्याइतके पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे आपण छातीठोकपणे सांगू शकतो की आमचा तिसरा उमेदवार विजयी होणारच. (Rajysabh Election 2022 News Updates)

Dhananjay Mahadik News | Girish Mahajan News, Jalgaon News, Rajysabh Election 2022 News Updates
बसमधून उतरलेले एकनाथ शिंदे परतले; शिवसेना आमदारांचा जीव भांड्यात

शिवसेनेचे आमदारा त्यांच्यावर नाराज आहेत. ते आता जाहीरपणे मंत्री टक्केवारी घेत असल्याची टीका करीत आहेत, घटक पक्षातील बच्चू कडू, अबू आझमी नाराज आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीला त्यांचा पराभव दिसत आहे. त्यासाठी आता हॉटेल टू हॉटेल धावपळ सुरू आहे. त्यांना आता आपल्याच आमदारांवर भरोसा राहिलेला नाही. आमचा विजय निश्चित असून राज्यांतील बदलाची ही नांदी असेल असा आपला ठाम विश्वास आहे.

Dhananjay Mahadik News | Girish Mahajan News, Jalgaon News, Rajysabh Election 2022 News Updates
सुभाष देसाईंना धक्का: शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना संधी

दरम्यान गिरीश महाजन यांनी नुकतीच बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेत, राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. तब्बल दोन तासांच्या या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी आपण बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी इथे आलो असल्याचे सांगितले. या भेटीत महाजन यांनी ठाकूर यांच्याकडून पाठिंब्यासाठीचा शब्द घेवूनच बाहेर पडले अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. ठाकूर यांनीही राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा मिळवा म्हणून महाजन आले होते, असे सांगितले. मात्र आम्ही अजून कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेतला नाही, असेही स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in