महाजन लागले कामाला; हितेंद्र ठाकुरांकडून शब्द घेवूनच 'बविआ'चे कार्यालय सोडले

Rajya Sabha Election | Girish Mahajan : भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन 'बविआ' ची मते मिळविण्यात यशस्वी होणार का?
Hitendra Thakur - Girish Mahajan
Hitendra Thakur - Girish Mahajan Sarkarnama

(Rajyasabha Election 2022 Latest News)

विरार : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) यापैकी नेमका कोणाचा उमेदवार विजयी होणार याचा निर्णय केवळ अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांच्या हातात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी टॉप टू बॉटमचे नेते कामाला लागले आहेत. शिवाय स्वतः उमेदावर देखील राज्यभरातील आमदारांच्या भेटीसाठी दौऱ्यावर आहेत. नुकतेच भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता भाजपचे संकटमोचन ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनीही हितेंद्र ठाकूर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेत, राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. (Rajyasabha Election 2022 Latest News)

राज्यसभेसाठी एक-एक मतासाठी बेगम सुरु असल्यामुळे सध्या ३ मते असलेल्या बहुजन विकास आघाडीला चांगले दिवस आले आहेत. या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना भेटण्यासाठी भाजप आणि सेनेची नेते मंडळी त्यांच्या कार्यालयात येत आहेत. धनंजय महाडिक यांनी दोन दिवसांपूर्वी ठाकुर यांची भेट घेतल्यानंतर लगेचच शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि आमदार सुनील राऊत यांनी ठाकुर यांची भेट घेतली. आता भाजपचे संकट मोचन ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी रात्री उशिरा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आणि त्यांना राज्यसभेसाठी बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा मागितला आहे.

राज्यसभेसाठी हितेंद्र ठाकूर यांच्या पाठिंब्यासाठी भाजपचे नेते आता ठाकूरांच्या कार्यालयात येत आहेत. मात्र यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हितेंद्र ठाकूर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतल्यानंतर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ठाकूर यांच्या कार्यालयाजवळ गोंधळ घालून नारायण राणेंच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे वसई-विरार मधील स्थानिक भाजपचे कार्यकर्ते हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या विरोधात असल्याने आता राज्यसभेसाठी ठाकूर यांचा पाठिंबा कसा चालतो? असा प्रश्न बविआचे कार्यकर्ते विचारत आहेत. (Rajyasabha Election 2022 Latest News)

तब्बल दोन तासांच्या या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी आपण बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी इथे आलो असल्याचे सांगितले. या भेटीत महाजन यांनी ठाकूर यांच्याकडून पाठिंब्यासाठीचा शब्द घेवूनच बाहेर पडले अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. ठाकूर यांनीही राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा मिळवा म्हणून महाजन आले होते, असे सांगितले. मात्र आम्ही अजून कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेतला नाही, असेही स्पष्ट केले.

एक मात्र नक्की हितेंद्र ठाकूर हे ज्याला पाठिंबा देतील त्यांच्याकडून विकासाची कामे करून घेतील. २००१ मध्ये विलासराव देशमुख यांचे सरकार अडचणीत आले असता ठाकुरांनी आपल्या एकमताच्या जोरावर वसई विरारसाठी सूर्या पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली होती. आता यावेळी ते केंद्राच्या विकासाच्या योजना आणतात कि, राज्य शासनाकडून योजना मंजूर करवून घेतात यावर ते कोणाला पाठिंबा देतात, हे ठरणार आहे. (Rajyasabha Election 2022 Latest News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com