Girish Mahajan News : 'मार्ड'च्या डॉक्टरांसाठी गुड न्यूज ; निवासी डॉक्टरांची तब्बल एवढी पदे भरणार

Girish Mahajan News : जेजे महाविद्यालयासाठी 13 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

Girish Mahajan News : वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आपला संप मागे घेतला आहे. मार्डने पुकारलेल्या संपानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

वसतीगृहाच्या डागडुजीसाठी शासनाने निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. जेजे महाविद्यालयासाठी 13 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. निवासी डॉक्टरांच्या 1432 पदांच्या भरतीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Girish Mahajan
MLA Yogesh Kadam : आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात

गिरीश महाजन यांनी मार्डच्या डॉक्टरांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वरिष्ठ निवासी संवर्गातील १ हजार ४३२ पदे भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे. सद्यस्थितीत काम करणाऱ्या या निवासी डॉक्टरांवरील ताण निम्म्याने कमी होणार आहे.

Girish Mahajan
MLA Yogesh Kadam Accident : अपघात नव्हे, घातपात ? ; चौकशीसाठी आमदार कदमांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

शासनाच्या २३ वैद्यकीय महाविद्यालयांच्या आस्थापनेवर नव्याने पद निर्मिती केली जाणार आहे. वरिष्ठ निवासी डॉक्टरांची संख्या आता २ हजार २७६पर्यंत वाढणार आहे. मार्डला दिलेल्या आश्वासनाची राज्य सरकार दोन दिवसांत पूर्तता करणार आहे.

चार दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी मार्डच्या डॉक्टरांना वरिष्ठ निवासी डॉक्टरांची भरती दोन दिवसांत करण्याचे आश्वासित केले होते. त्याची पूर्तता केल्याने आता डॉक्टरांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान निवासी डॉक्टरांच्या निवासाची डागडुजी आणि पुनर्बांधणी तात्काळ करावी, अशी मागणी आता मार्डने केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com