लोकसभेच्या अंदाज समितीचे गिरीश बापट चौथ्यांदा अध्यक्ष

अनुभवी संसदपटू म्हणून गिरीश बापट (Girish Bapat) यांची ओळख आहे.
MP Girish Bapat
MP Girish Bapatsarkarnama

दिल्ली : लोकसभेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष म्हणून खासदार गिरीश बापट यांची चौथ्यांदा निवड झाली आहे. ही निवड एक वर्षासाठी असून या आधीचे तीन वर्षे बापट यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

खासदार बापट हे एक मे 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत एस्टिमेट कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. या समितीमध्ये 30 खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून खासदार सुनील तटकरे यांचाही या समितीत समावेश आहे. लोकसभेमध्ये सादर झालेल्या विविध प्रकारच्या अंदाजपत्रकांची छाननी करणे. त्याची तपासणी करणे व केंद्र सरकारला सूचना करणे. यासाठी 1950 पासून ही समिती अस्तित्वात आली.

MP Girish Bapat
इच्छुक म्हणतात, भाजप-मनसे युती हाच पर्याय!

ही समिती अंदाजपत्रकात प्रशासकीय सुधारणा सुचविणे. अंदाजपत्रकाच्या मर्यादेत खर्च झाला की नाही, याची पाहणी करणे. प्रशासनाची कार्यक्षमता व त्याचे अर्थकारण याविषयी सल्ला देणे व अंदाजपत्रका बाबत धोरणात्मक प्रस्ताव देणे, अशा प्रकारची कामे ही समिती करते. यापूर्वी भाजपा नेते मुरली मनोहर जोशी या समितीचे अध्यक्ष होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com