कोरोना लसीमुळे नव्हे तर 'या' कारणामुळे झाला घाटकोपरच्या त्या मुलीचा मृत्यू

डॉ. तरुण तिवारी (Dr. Tarun Tiwari) यांनी आर्यबेन रुपेशभाई गोविंदभाई (Aryaben Rupeshbhai Govindbhai) हिचा फोटो शेअर करत ट्रायल लसीकरणामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगत ट्रायल लसीकरण न करण्याचे आवाहन केले होते.
कोरोना लसीमुळे नव्हे तर 'या' कारणामुळे झाला घाटकोपरच्या त्या मुलीचा मृत्यू

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीमुळे (vaccination) घाटकोपरच्या एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. डॉ. तरुण तिवारी (Dr. Tarun Tiwari) यांनी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन घाटकोपरच्या आर्यबेन रुपेशभाई गोविंदभाई (Aryaben Rupeshbhai Govindbhai) हिचा फोटो शेअर करत ट्रायल लसीकरणामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगत ट्रायल लसीकरण न करण्याचे आवाहन केले होते. मात्र मुंबई महापालिकेने (BMC) लसीकरणामुळे मुलीचा मृत्यू झाला नसल्याचा दावा महानगर पालिकेनं केला आहे.

घाटकोपरमधील 15 वर्षीय आर्याने 8 जानेवारी रोजी राजावाडी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. मात्र लस घेतल्यानंतर 12 जानेवारीला अचानक तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर सोशल मिडीयावर कोरोना प्रतिबंधक लसीमुळे तिचा मृत्यू झाल्याचा मजकूर तिच्या फोटोसह सोशल मीडियावर टाकण्यात आला होता. यानंतर पालिका प्रशासनाने डॉ. तरुण तिवारी यांच्याकडे आर्याचा मृत्यू लसीकरणामुळे मृत्यू झाल्याचे पुरावे मागितले. पण त्याच्याकडे एकही पुरावा नव्हता.

या घटनेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी आर्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आर्याच्या आजोबांच्या मते आर्याने अभ्यासाचा अतिताण घेतला होता. हा ताण असह्य झाल्याने तिला हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. लसीकरणामुळे तिचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूचं कोणीही राजकारण करू नये, असं आवाहनही किशोरी पेडणेकरांनी केलं आहे.

याबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. लसीकरण घेतल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर आर्याचा मृत्यू झाला. खाजगी डॉक्टरांनी तिच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावर मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असंच लिहिलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com