तयारीला लागा! गृहमंत्र्यांनी केली पोलीस भरतीची तारीख जाहीर

Police recruitment|Maharashtra| Dilip-walse Patil| दिलीप वळसे पाटलांनी पुढच्या महिन्यात पोलीस भरती सुरु होणार असल्याची घोषणा केली आहे.
तयारीला लागा! गृहमंत्र्यांनी केली पोलीस भरतीची तारीख जाहीर
Police recruitment Sarkarnama

Police recruitment news in Maharashtra

मुंबई : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी राज्यातील तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. जून महिन्यापासून राज्यात पोलिस भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे पोलीस खात्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहे.

एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या 'प्रश्न महाराष्ट्राचे' या कार्यक्रमात बोलताना दिलीप वळसे पाटलांनी राज्यात जून महिन्यापासून पोलिस भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती दिली. गृह विभागाने आतापर्यंत साडेपाच हजार पोलिस भरती पूर्ण केली आहे. तसेच सात हजारांच्या भरती प्रक्रियेला साधारणपणे १५ जूनपासून सुरुवात होईल, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

Police recruitment
गोपीचंद पडळकरांची विकेट धनंजय मुंडे हेच घेणार...

याशिवाय पोलिस विभागात स्टाफची असलेली कमतरता लक्षात घेऊन अधिकची १५ हजार पदे भरण्याची मागणी गृह विभागाकडून मंत्रिमंडळाकडे केली जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका सकारात्मक आहे. यातून राज्यातील अनेक तरूण मुलांना पोलिस विभागात काम करण्याची संधी निश्चित मिळेल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात पोलीस बदल्यांचा विषय चर्चेत आहे, यावर उत्तर देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आम्ही अतिशय पारदर्शक पणाने बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यात कोणत्याही परिस्थितीत पोलिसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय बदल्या करणार नाही. परंतू प्रशासनिकदृष्ट्या जेव्हा जेव्हा आवश्यक असते तेव्हा तेव्हा त्या बदल्या करणे आवश्यक असते तेव्हा तेव्हा त्या बदल्या कराव्या लागतात. कधी कधी बदल्यासाठी विनंत्या केल्या जातात, त्यात इन्स्पेक्टर पर्यंतच्या बदल्यांचे अधिकार डीजींना आहेत.

डीवायएसपींच्या बदल्यांचे अधिकार मंत्र्यांच्या लेव्हलवर घेतले जातात आणि आयएएस पर्यंतच्या सर्व बदल्या या मुख्यमंत्र्यांपर्यंत जातात. पोलिसांच्या बदल्यांसाठी एक कमिटी ठरली आहे. या कमिटीच्या माध्यमातूनच बदल्या होत असतात. त्याच माध्यमातून पोलिसांच्या बदल्यामध्ये पारदर्शकता राखण्याचे आश्वासन मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो. असंही दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in