शिंदे सरकारचा 'तो' निर्णय अन् अदानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांची नुकतीच भेट झाली
Gautam Adani, Uddhav Thackeray
Gautam Adani, Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांची नुकतीच भेट झाली. गौतम अदानी बुधवारी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी 'मातोश्री'वर गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. या अनपेक्षित भेटीची राजकीय वर्तुळात मात्र, मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

राज्यात सत्तापालट झाल्यामुळे ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातातील सर्व अधिकार गेले आहे. शिवसेना पक्ष मोठ्या संकटात आहे. मात्र, अशा परिस्थितीत गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर का गेले असावेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामागील संभाव्य कारण आता समोर येत आहे.

Gautam Adani, Uddhav Thackeray
गटप्रमुख मेळावा तो सिर्फ झाकी है, दसरा मेळावा अभी बाकी है; मेळावा 'शिवतीर्था'वरच होणार...

शिंदे सरकारने अलीकडेच धारावीच्या पुनर्विकासासाठी निवीदा मागवण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना धारावी पुनर्विकासाबाबत तीन बैठका झाल्या होत्या. त्यावेळी धारावी प्रकल्पासाठी अदानी समूहाचे नाव चर्चेत होते. ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को मैदानावर झालेल्या शिवसेना मेळाव्यात धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित केला होता.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते, धारावीला महत्त्वाचे आर्थिक केंद्र बनवणे हे शिवसेनेचे उद्दिष्ट आहे. हे स्वप्न शिवसेनाच प्रत्यक्षात उतरवेल. या पार्श्वभूमीवर अदानी आणि ठाकरे यांच्या भेटीला विषेश महत्त्व प्राप्त झाले आहे.

Gautam Adani, Uddhav Thackeray
Jayant Patil : शरद पवार चमत्कार घडवू शकतात, हा लोकांना विश्वास..

गौतम अदानी व उद्धव ठाकरे यांच्यात पूर्वापार मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यामुळे कालची भेट ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मुंबईमध्ये अदानी समूहाला व्यावासायिकदृष्ट्या रस आहे. धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प मिळाल्यास अदानी समूहासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असू शकतो. त्या संदर्भात या भेटीत काही चर्चा झाली असा, अशी शक्याता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in