Shiv Sena : "५० खोके एकदम ओके" : गणेशोत्सवातही शिंदे गटाला डिवचलं

Shiv Sena : जळगावातील काव्य रत्नावली चौकात युवा शक्ती फाउंडेशनच्या वतीने सार्वजनिक गणेश मूर्तींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
Shiv Sena news update
Shiv Sena news updatesarkarnama

जळगाव : "५० खोके एकदम ओके" या घोषणेमुळे विधानभवनाच्या पायऱ्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमदार एकमेकांना भिडल्याचे आपण काही दिवसापूर्वी पावसाळी अधिवेशनात पाहिले. हीच घोषणा जळगाव येथे आता गणेशोत्सवात शिवसैनिक (shiv sena) देत आहेत, यातून शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र आहे. गणेशोत्सव काळात सुद्धा राजकीय कुरघोडी सुरूच आहेत. (Shiv Sena news update)

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या गटातील आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठाकरे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करत होते. विरोधी पक्षातील आमदार 50 खोके एकदम ओके म्हणत शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न गेले काही दिवस केला. त्यानंतर या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिंदे गटातील आमदार विधीमंडळ्याच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. त्याचवेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे त्यांच्या समर्थक आमदारांसह आले. त्याचवेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाचे आमदार आमने सामने आले. त्यानंतर झालेला राडा सगळ्यांनी पाहिला.

जळगावातील काव्य रत्नावली चौकात युवा शक्ती फाउंडेशनच्या वतीने सार्वजनिक गणेश मूर्तींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याच निमित्ताने शहरात बाप्पाची आगमन मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. यामध्ये युवाशक्तीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Shiv Sena news update
Maharashtra Police : फडणवीसांकडून पोलिसांना मोठं गिफ्ट ; ठाकरे सरकारने बंद केलेली योजना सुरु

जळगाव येथे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवातही शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याची संधी सोडलेले दिसत नाही. काल (बुधवारी) गणपतीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येकाने "50 खोके एकदम ओके” असं लिहिलेलं टी – शर्ट परिधान केले होते.

या घोषणांमुळे उपस्थित सर्वांचेच लक्ष वेधले गेले. गणेशोत्सव काळात म्हणजे 10 दिवस हे टी- शर्ट सर्व कार्यकर्ते परिधान करणार आहेत. यामाध्यमातून युवासेनेने शिंदे गटातील(sm shinde shinde) आमदारांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

युवासेनेचे विभागीय सचिव आणि युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा शक्ती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत ”50 खोके एकदम ओके” असं लिहिलेले टी- शर्ट परिधान केले होते. गणपती बापा मोरया सोबतच "50 खोके एकदम ओके" अशा घोषणा देण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com