महापालिका निवडणुकीआधीच गणेश नाईकांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

आमदार गणेश नाईक राज्याच्या निवडणुक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे.
महापालिका निवडणुकीआधीच गणेश नाईकांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Ganesh Naik Sarkarnama

नवी मुंबई : विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमात नवी मुंबईतील मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार होत असून नाव एकाचे आणि छायाचित्र दुसऱ्याचे लावले जात आहे, असा आरोप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी केला आहे. या विरोधात त्यांनी राज्याच्या निवडणूक आयोगाकडे (State Election Commission) लेखी तक्रार केली आहे. हा प्रकार हा गंभीर असून या प्रकारांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महापालिका निवडणुकीआधीच नाईकांनी राज्य सरकावर गंभीर आरोप केला आहे.

Ganesh Naik
अजित पवार संतापले; म्हणाले, विमा कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा...

नाईकांच्या म्हणण्यानुसार, नवी मुंबईतील शहरी भाग, गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात सध्या बीएलओ स्तरावरील निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस मतदारांची नावे घुसविण्याचे प्रकार सुरू आहे. यामध्ये राज्यातील सत्ताधारी पक्षाचे लोक सक्रीय असल्याचा आरोपही नाईक यांनी राज्य सरकारवर केला आहे.

Ganesh Naik
राष्ट्रवादी भवनावरील दगडफेक दुर्दैवी : शरद पवार

नाईक म्हणाले, मतदार याद्यांमधील अनेक बोगस नावे वगळण्यासाठी आणि मयत व्यक्तींची नावे काढून टाकण्यासाठी नागारिकांनी कागदपत्रे सादर करूनही हेतूपुरस्पर ही नावे रद्द करण्यात आलेली नाहीत, असे दिसून येते. मतदार याद्यांमध्ये ज्या व्यक्तींची नावे आहेत मात्र, छायाचित्रे नाहीत. अशा व्यक्तींची छायाचित्रे स्विकारताना तीच खरी व्यक्ती आहे का? याची खातरजमा देखील केली जात नाही. त्यामुळे अनेक याद्यांमध्ये नाव एका व्यक्तीचे आणि फोटो दुसऱ्या व्यक्तीचा अशा नोंदी करण्यात आल्या आहेत.

राज्यातील सत्ताधारी पक्षाचे लोक दबाव टाकून हे गैरप्रकार करीत आहेत. निवडणुक प्रक्रीयेची त्यांच्याकडून थट्टा चालवली आहे. काही मतदार याद्यांमधील छायाचित्रे नसलेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तर, काही मतदार याद्यांमध्ये ती हेतुपूर्वक कायम ठेवण्यात आली आहेत. ही नावे वगळण्यासाठी निवदने देवूनही ती नावे अद्याप वगळण्यात आलेली नाही. याकडेही नाईक यांनी निवडणुक आयोगाचे लक्ष वेधले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in