गांधी कुटूंंबाने स्वातंत्र्य सैनिकांची दोन हजार कोटींची संपत्ती हडपली; फडणवीसांचा आरोप

Rahul Gandhi| Devendra Fadanvis| कॉंग्रेसने देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन करुन जनतेला वेठीस धरण्याचं जे काम केलं आहे. ते अत्यंत चूकीचं आहे
गांधी कुटूंंबाने स्वातंत्र्य सैनिकांची दोन हजार कोटींची संपत्ती हडपली; फडणवीसांचा आरोप
Devendra Fadanvis on Rahul gandhi ED Enquiry

Devendra Fadanvis on Rahul gandhi ED Enquiry

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खासदार राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलवलं आहे. पण कॉंग्रेसने देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन करुन जनतेला वेठीस धरण्याचं जे काम केलं आहे. ते अत्यंत चूकीच आहे. असे करुन कॉंग्रेस (Congress) व्हिक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहे. असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे. याच वेळी त्यांनी गांधी कुटूंबावर गंभीर आरोपही केले आहेत

पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांनी स्थापन केली एजेएल

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी भूमिका स्पष्ट केली आहे. स्वातंत्र्य काळात पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांनी 20 नोव्हेंबर 1937 रोजी असोसिएटेड जर्नल लिमिटेड (AJL) ची स्थापना केली. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचे प्रकाशन 1938 मध्ये सुरू झाले. त्याला पाच हजार स्वातंत्र्यसैनिकांनी पाठिंबा दिला होता आणि ते त्याचे भागधारक देखील होते. त्यातही अनेक मोठे नेते होते.

Devendra Fadanvis on Rahul gandhi ED Enquiry
कॉंग्रेस एकवटली पण भाजपची धाकधूक वाढली ?

गांधी कुटूंंबाने दोन हजार कोटींची संपत्ती हडपली

पण 2010 मध्ये गांधी कुटूंबाने केवळ पाच लाखांची कंपनी यंग इंडिया कंपनी स्थापन करुन या कंपनीत एजेएलचे सर्व शेअर्स ट्रान्सफर केले. या माध्यमातून गांधी कुटूंबाने पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांची दोन हजार कोटींची संपत्ती हडपली. स्वातंत्र्य सैनिकांची संपत्ती हडपणे गुन्हा आहे. ही संपत्ती देशाची संपत्ती आहे. तिचे अशा प्रकारे खासगीकरण करणे गुन्हा आहे.

Devendra Fadanvis on Rahul gandhi ED Enquiry
भाजपने सोनिया-राहुल यांना पुरते कोंडित पकडले... काय आहे ईडीच्या नोटिशीचे कारण?

गांधी कुटूंबाने चौकशीला सामोरे जावे

दिल्ला न्यायालयाला या बाबत पुरावे मिळाल्यानंतरच न्यायालयाने ईडीला कारवाईचे आदेश दिले आहे. त्यामुळे राहुल गांधींनी या चौकशीला सामोरे जावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच राहुल गांधी यांच्या कारवाईवक देशात वातावरण तयार केलं जात आहे ते चुकीचं आहे, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. पाच हजार स्वातंत्र सैनिकांची संपत्ती आहेत. जर कोणी ती खासगी करुन घेत असेल तो गुन्हा आहे. असेही फडणवीसांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in