गजभिजेंनी दिला काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा : हंडोरेंच्या पराभवात षडयंत्र

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे ( Chandrakant Handore ) यांचा पराभव झाला.
गजभिजेंनी दिला काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा : हंडोरेंच्या पराभवात षडयंत्र
Chandrakant HandoreSarkarnama

मुंबई - राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीनंतर राजकीय उलथा पालथ सुरू झाली आहे. शिवसेनेचे काही मंत्री व आमदार भाजपच्या गोटा गेले आहेत. तर या निवडणुकीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे ( Chandrakant Handore ) यांचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेस पक्षातही उघड नाराजी दिसून येत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर गजभिजे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी याबाबतची भुमिका व्यक्त केली. ( Gajbhije resigns as Congress state vice-president: Conspiracy to defeat Handore )

किशोर गजभिजे म्हणाले, विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंती क्रमाची मते द्यावीत, असे पक्षाचे आदेश होते. असे असतानाही त्यांचा जो पराभव झाला, तो विस्मय कारक आहे. तो पराभव आमच्या जिव्हारी लागला आहे. कारण चंद्रकांत हंडोरे हे आमचे नेते आहेत. त्यांचा मुद्दाम घडवून आणलेला हा पराभव आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षातीलच काही लोक जबाबदार असावेत, असा आमचा कयात आहे.

Chandrakant Handore
काँग्रेसचे पाच आमदार नॅाट रिचेबल; बाळासाहेब थोरात म्हणाले...

ते पुढे म्हणाले की, जे झाले ते मानहाणी कारक, संतापजनक व खेद कारक आहे. हा खेद व्यक्त करण्यासाठी मी प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. आमच्या हातात जे आहे ते आम्ही करू शकतो. चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव हेच राजीनामा देण्यामागील एकमेव कारण आहे. हंडोरे हे दलित आहेत. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाची होती. मात्र वेगळेच घडले आहे. याची चौकशी झाली पाहिजे. दगाफटका करणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Chandrakant Handore
हंडोरेंच्या पराभवाने काॅंग्रेसमध्ये खळबळ; बाळासाहेब थोरात राजीनाम्याच्या मूडमध्ये ?

हंडोरे यांना 29चा कोटा दिला होता मात्र प्रत्यक्षात 22 मते मिळाली. याचा अर्थ पक्ष श्रेष्ठींचा आदेश काँग्रेसच्या सात आमदारांनी डावलला. त्यांची नावे लवकरच उघड होतील. मंत्री बाळासाहेब थोरात यांना केवळ आत्मचिंतन करून भागणार नाही. ही उच्च दर्जाची बेशिस्त आहे. यावर थोरातांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली.

धनशक्ती समोर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. त्यांचा पराभव ठरवून करण्यात आला आहे. कदाचित चंद्रकांत हंडोरे यांची पक्षातील उंची वाढू नये यासाठी काही जणांनी हा प्रकार केला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in