किर्तीकरांच्या रिक्त पदासाठी ठाकरे गटात चुरस, सहा नेत्यांची नावे चर्चेत

Shivsena News : खासदार किर्तीकर यांच्याकडे लोकाधिकार समितीचे अध्यक्षपद होते
Gajanan Kirtikar, Uddhav Thackeray
Gajanan Kirtikar, Uddhav ThackeraySarkarnama

Shivsena News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करुन अनेक नेत्यांना आपल्या गळाला लावले आहे. त्यातच आता खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश केला. किर्तीकरांच्या पक्षांतरानंतर त्यांची रिक्त पदे मिळवण्यासाठी ठाकरे गटात चुरस निर्माण झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

खासदार किर्तीकर यांच्याकडे लोकाधिकार समितीचे अध्यक्षपद होते. या पदासाठी आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा नेत्यांमध्ये स्पर्धा रंगल्याचं बोललं जात आहे. किर्तीकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांची पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी केली. ते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधेही होते. आता किर्तीकरांच्या गच्छंतिनंतर शिवसेना नेतेपद आणि लोकाधिकार समितीचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न केली जात असल्याचे सांगितले जात आहे.

Gajanan Kirtikar, Uddhav Thackeray
शिंदे गटात नाराजीचा 'बॉम्ब'; आमदार कांदेंचे पालकमंत्री भुसेंवर गंभीर आरोप

त्यामध्ये राज्यसभा खासदार अनिल देसाई यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. ते स्थानिय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस आहेत. अनेक वर्षांपासून ते स्थानिय लोकाधिकार समितीत काम करतात. शिवाय ठाकरे कुटुंबाशी ते निष्ठावाण आहेत. त्यामुळे हे पद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

देसाई सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव आहेत. देसाईंना दोन्ही पदे मिळतात की एकच, की एकही नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याशिवाय खासदार विनायक राऊत, माजी मंत्री अनिल परब, डॉ. नीलम गोऱ्हे, रवींद्र मिर्लेकर, विश्वनाथ नेरूरकर यांचीही नावे आघाडीवर आहेत, अशी चर्चा आहे.

Gajanan Kirtikar, Uddhav Thackeray
गजाभाऊंना म्हातारचळ लागलाय; खैरेंनी तोफ डागली...

मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात काल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार आणि कार्यकर्ता मेळाव्यात किर्तीकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा झेंडा हाती घेतला. यावेळी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ हे देखील उपस्थित होते. मात्र, गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com