Samruddhi Mahamarg News : 'समृद्धी'वरील प्रकल्पांना मोदी सरकारकडून निधीची शक्यता; अहवाल केंद्राकडे पाठवणार..

Samruddhi Mahamarg Project Fund By Modi Sarkar : केंद्र सरकारला अहवालातील मुद्दे पटले तर समृद्धीवरच्या प्रकल्पांना केंद्राचा निधी...
Samruddhi Mahamarg News
Samruddhi Mahamarg NewsSarkarnama

Mumbai News : समृ्द्धी महामार्गावरील प्रकल्पांना केंद्र सरकारकडून निधी मिळण्याची शक्यता आहे. नागपूर आणि बुलढाणा जिल्ह्यातील समृ्द्धी महामार्गावरील स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना केंद्राचा निधी मिळण्याची शक्यता आहे. नुकतीच या दोन जिल्ह्यामधील काही ठिकाणांची पाहणी करण्यात आली. त्यानुसार आता केंद्राचा निधी मिळण्याची शक्यता दिसून येत आहे. (Latest Marathi News)

Samruddhi Mahamarg News
CM On Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्ग अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

समृद्धी महामार्गावरील नागपूर येथील विरूर आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या माळ सावरगाव येथील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नियोजित प्रकल्पांची काल सोमवारी (दि. ४ सप्टेंबर ) केंद्रीय पथकाने अचानक पाहणी केली. केंद्र सरकारचा परफॉरमन्स चॅलेंज निधी कोणत्याही नवीन प्रकल्पांना मिळवण्यासाठी सर्वप्रथम हैदराबाद येथील एआयसीआय या संस्थेकडून पाहणी केली जाते. प्रकल्पस्थळाची पाहणी केल्यानंतर हे अधिकारी आपला अहवाल केंद्र सरकारकडे पाठवतात. त्यानंतर अशा प्रकारच्या प्रकल्पांना केंद्र सरकारकडून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.

Samruddhi Mahamarg News
Samruddhi Mahamarg Farmer's Andolan: सिन्नरच्या शेतकऱ्यांनी थेट समृद्धी महामार्गच रोखला!

यानुसार आता प्रकल्पाची पाहणी तर झाली आहे. यानंतर अहवाल सादर करून तो केंद्र सरकारला सादर केला जाईल. केंद्र सरकारला अहवालातील मुद्दे पटले तर समृद्धीवरच्या प्रकल्पांना केंद्राचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे आता समृद्धी महामार्गावरील प्रकल्पांची केंद्र सरकारच्या साहाय्याने 'समृद्धी' होण्याची शक्यता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in