भाजप आमदाराच्या घरासमोर सापडलं मोठं घबाड ; सोने, चांदीच्या मूर्ती अन् रोख रक्कम

बॅगमध्ये सोने, चांदीच्या मूर्ती आणि रोख रक्कम आढळली आहे. अशा प्रकारे आमदारांच्या घरासमोर बॅग ठेवल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
 prasad lad
prasad ladsarkarnama

मुंबई : भाजप (bjp) आमदाराच्या घरासमोर आज पहाटे एक बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. आज आषाढी एकदशी आहे. त्यामुळे अशा प्रकारची बॅग आढळल्याने याकडे संशयाने पाहिले जात आहे. (prasad lad news update)

या बॅगमध्ये सोने, चांदीच्या मूर्ती आणि रोख रक्कम आढळली आहे. अशा प्रकारे आमदारांच्या घरासमोर बॅग ठेवल्याने संशय व्यक्त केला जात आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड (prasad lad) हे मांटुंगा येथे राहतात.

प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सुरक्षारक्षकाला आज (रविवारी) एक बॅग सापडली. याबाबत त्यांनी लाड यांना ही माहिती दिली. त्यानंतर लाड यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. या बॅगेमध्ये सोने, चांदीच्या मूर्ती आणि रोख रक्कम आढळली आहे.

 prasad lad
Ashadhi Ekadashi 2022 : राज्याच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडे

पहिल्यांदा बॅगवरुन परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. ही बॅग कुणाची आहे, त्याने ही बॅग प्रसाद लाड यांच्या घरासमोर का टाकली अजून समजू शकले नाही.

पहाटे कुणीतरी ही बॅग सोडून पसार झाले असावे, असे प्राथमिक तपासातून समोर येत आहे, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मांटुंगा पोलिस अधिक तपास करीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in