Kunda Naik Passes Away : युपीचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या पत्नी कुंदा नाईक यांचं निधन

कुंदा नाईक यांनी महापालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या
Kunda Naik Passes Away
Kunda Naik Passes AwaySarkarnama

Kunda Naik Passes Away : उत्तर प्रदेशच्या माजी महिला राज्यपाल राम नाईक यांच्या पत्नी कुंदा नाईक यांचे सोमवारी सायंकाळी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. राम नाईक यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य गतिमान ठेवण्यासाठी कुंदा ताई नाईक यांनी आयुष्यभर घरातील आर्थिक आणि व्यावहारिक धुरा आपल्या हाती घेतली.

कुंदा नाईक यांनी महापालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यामुळेच राम नाईक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नंतर जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या पूर्णवेळ कामाला न्याय देऊ शकले. कुंदा नाईक यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी राम नाईक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. श्रीमती कुंदा ताई नाईक यांच्या पश्चात माजी राज्यपाल राम नाईक, मुली निशिगंधा नाईक, विशाखा कुलकर्णी आणि नातू अॅड.शार्दुल कुलकर्णी असा परिवार आहे.

Kunda Naik Passes Away
Thorat-Patole Dispute: थोरात-पटोले वादावर तोडगा निघणार? निवडणुकांपूर्वी कॉंग्रेसमध्ये फेरबदलाची शक्यता

2013 मध्ये राम नाईक यांनी खुल्या मंचावरून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. आगामी निवडणूक 2014 च्या लोकसभा निवडणूक भाजपला प्रचंड जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर राम नाईक यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल बनवण्यात आले. ते 2019 पर्यंत या पदावर होते. यानंतर राम नाईक सक्रिय राजकारणापासून दूर झाले. मात्र, त्यांनी राजकारणात पुनरागमन करण्याची घोषणा केली. तेव्हा ते म्हणाले होते की अजून 25 वर्षे बाकी आहेत. माणसाने 100 वर्षे सक्रिय राहण्याचा प्रयत्न करायला हवा. मी 85 वर्षे पूर्ण केली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in