लोकांच्या सहनशीलतेचा खेळ मांडलायं, भोईरांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

CM Eknath Shinde : नारळ फोडता तेव्हा काम सुद्धा झाली पाहिजेत.
CM Eknath Shinde, Subhash Bhoir Latest News
CM Eknath Shinde, Subhash Bhoir Latest NewsSarkarnama

डोंबिवली : कल्याण शीळ ते पत्रिपुलचा जो रस्ता आहे, त्यापेक्षा आईस फॅक्टरी येथील रस्ताचे काम नक्कीच खूप चांगले केलेले आहे. उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती लोकांना चांगल्या प्रकारे काम करून देणारी शिवसेना आहे. लोकांना शब्द दिला की तो पूर्ण करण्याचा काम आम्ही करतो, फक्त वल्गना करत नाही, असा टोला ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार सुभाष भोईर (Subhash Bhoir) यांनी राज्य सरकारला व नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रस्त्याच्या कामावरून लगावला. (CM Eknath Shinde, Subhash Bhoir Latest News)

कल्याण-डोंबिवलीमधील शिवाजी उद्योग नगर येथील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणचे काम भोईरांच्या यांच्या विशेष आमदार निधीतून करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याचे उद्घाटन भोईर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख भाऊसाहेब चोधरी, कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, प्रकाश म्हात्रे, सुखदेव पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांची अवस्था खराब असून लोकांनी आता आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. याविषयी बोलताना भोईर यांनी कल्याण शीळ रोडचे सीमेंट काँक्रीटीकरणचे काम जर पाहिले ते त्यापेक्षा 25 लाखाचा निधी आलेल्या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे झाले आहे, असे म्हणत तत्कालीन नगरविकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता टोला लगावला.

कोणत्याही प्रकारचा घोटाळा न करणारी ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आहे. काम केल्यावर उदघाटन करतो नारळ फोडण्याचा प्रकार आम्ही करत नाही. एमआयडीसी निवासी भागामधील रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर झाला. मोठा गाजावाजा करत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला गेला. मात्र, अद्याप कामाला सुरुवात नाही.

यावरून भोईर म्हणाले की,आमदार असताना मी स्वतः 48 कोटी रुपयांचा निधी एमआयडीसी कडून आणला होता. त्यामध्ये नाल्यांची कामे, स्ट्रीट लाईट चे काम केले गेले. आम्ही वचन देतो ते पूर्ण करतो फक्त वलग्ना करत नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना लक्ष केले. लोकांच्या सहनशीलतेचा खेळ मांडला आहे यांनी. नारळ फोडता तेव्हा काम सुद्धा झाली पाहिजेत. फक्त निधी आला असं भासवतात पण काम प्रत्यक्षात होत नाहीत म्हणून लोक नाराज झाल्याचेही भोईर म्हणाले.

मानपाडा रस्त्याचे काम पीडब्ल्यूडी मार्फत करण्यात येणार आहे. मात्र सध्या मानपाडा रस्त्याच्या कामावर स्टे आणला आहे. पीडब्ल्यूडी मंत्री रविंद्र चव्हाण हे स्वतः डोंबिवलीचे रहिवासी आहेत. याविषयी भोईर म्हणाले, मंत्री चव्हाण हे माझे मित्र पण आहेत. त्यांना नक्कीच पत्रव्यवहार केला जाईल. त्यांनी या रस्त्याला प्राधान्य द्यावे. या कामावरील स्टे उठवून लोकांना होत असलेला त्रास दूर करावा आणि त्या रस्त्याच्या काम कोणताही गाजावाजा न करता सुरू करावे अशी विनंती मी त्यांना लोकांच्या माध्यमातून करेल,असेही भोईर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com