मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना CBI कडून अटक!

sanjay pandey : न्यायालयाने पांडे यांना पुढील तपासासाठी 4 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
Sanjay Pande
Sanjay Pandesarkarnama

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), फोन टॅपिंग प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आज अटक करण्यात आली. ईडीनेही त्यांना यापूर्वी अटक केली होती. आता न्यायालयाने पांडे यांना पुढील तपासासाठी 4 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

संजय पांडे यांना याआधीही ईडीकडून अटक करण्यात आली होती. याची चौकशीही सुरु होती. दरम्यान, 2 ऑगस्ट रोजी, त्यांना रोज अव्हेन्यू कोर्टाने त्यांना 16 ऑगस्टपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर पांडे यांच्याकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला, मात्र न्यायालयाने जामीन दिले नव्हते.

Sanjay Pande
शिंदे-फडणवीस सरकारकडून पालकमंत्र्यांची घोषणा; कुणाला मिळाला कोणता जिल्हा पहा...

पांडे हे नुकतेच निवृत्त झाले होते. 2009 ते 2017 दरम्यानचा कालावधीत NSE कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवणयात आला होता. आयएसईसी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने त्यांना 4.45 कोटी रुपये दिल्याचे ईडीच्या तपासात समोर आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in