'हे सी ग्रेड कपल फारच वाह्यातपणा करतय!'

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर टीका
Kishori Pednekar, Navneet Rana
Kishori Pednekar, Navneet Ranasarkarnama

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी खासदार नवनीत राणांवर यांच्यावर जहरी टीका केली. याआधीही शिवसेनेने लीलावती रुग्णालयात जाऊन नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या उपचारासंदर्भात पोलखोल केली होती. यावर बोलताना पेडणेकर म्हणाल्या, नवनीत राणा सी ग्रेड पब्लिसिटी च्या नादात काहीही बरळत आहेत. त्या रुग्ण नाहीत तर मनोरुग्ण झाल्या आहेत, असा शब्दांत पेडणेकर यांनी राणांवर निशाणा साधला. (Kishori Pednekar Latest News)

पेडणेकर मुंबईत बोलत होत्या. यावेळी पेडणेकर म्हणाल्या, संताप होतोय या गोष्टीचा. न्यायालयाने नियमावली घालुन दिली. लीलावती सारख्या रुग्णाल्याला काळिमा फासण्याचे काम केले. आपल्या पतीशी गळाभेट केली. जो काय लव्ह सीन केला त्याला देखील आम्ही आक्षेप घेतला नाही, असेही पेडणेकर यांनी सांगितले. हे सी ग्रेड कपल फारच वाह्यात पणा आता करत आहेत. पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी पेडणेकर यांनी केली.

Kishori Pednekar, Navneet Rana
'सदाभाऊ खोतांनी भाजपलाच शालीतून जोडा लगावला आहे...!'

मुख्यमंत्र्यांना हे ललकारत आहेत. हे ललकारणे नाही तर ही खाज आहे. लहान मुलांना राजकारणात ओढणे योग्य नाही. त्यांना स्क्रिप्ट लिहून दिली होती. आई बाप म्हणून भान असावे जरा तरी जबाबदारीने वागा, असा सल्लाही पेडणेकर यांनी दिला. हे मर्दानगी वगरे बोलणे या बाईला शोभत नाही. सी ग्रेड तर आहातच पण अजून किती खाली जाणार, आम्ही डॉक्टरांना खडसावत नव्हतो. जाणीव करून देत होतो की अशी चूक परत होता कामा नये. अनेकांचे जीव धोक्यात घालण्याचे काम यांनी केले, असा आरोप पेडणेकर यांनी केला.

Kishori Pednekar, Navneet Rana
देशद्रोहातून दिलासा मिळू शकतो पण राणा दाम्पत्याला 'ही' दोन कलमे पडणार महागात?

राणा बाई ही रुग्ण नाही तर मनोरुग्ण आहे. कितीही खालच्या भाषेत बोलले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या इमेजवर परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याच बरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या पत्रावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. पेडणेकर म्हणाल्या, राज साहेब किंवा कोणाच्याही जीवाला काही होऊच नये. याची नक्कीच दखल घेतली जाईल, फक्त आमचा प्रश्न आहे मुंबई पोलिसांवर यांना विश्वास आहे का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com