चार वेळा पक्ष बदलला ; शिवसेनेला दुसऱ्यांदा 'जय महाराष्ट्र', माजी खासदार भाजपमध्ये

माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने मी शिवसेना सोडली.
चार वेळा पक्ष बदलला ; शिवसेनेला दुसऱ्यांदा 'जय महाराष्ट्र', माजी खासदार भाजपमध्ये
sarkarnama

मुंबई :"शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास द्यायला सुरवात केली, मुळात आता सगळेच मुद्दे सोडलेले आहेत. म्हणून मी शिवसेना सोडली आणि भाजपमध्ये (BJP)प्रवेश केला," असे हिंगोलीचे माजी खासदार शिवाजी माने (Shivaji Mane)यांनी सांगितले. शिवसेनेला दुसऱ्यांदा 'जय महाराष्ट्र' ठोकत माने हे भाजपमध्ये आले आहेत.

मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) , प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजी माने यांनी मुंबईत येथे भाजपमध्ये प्रवेश केला. शिवाजी माने शिवसेनेच्या तिकीटावर दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी चारवेळा पक्ष बदल केला आहे.

चार वेळा पक्ष बदलला ; शिवसेनेला दुसऱ्यांदा 'जय महाराष्ट्र', माजी खासदार भाजपमध्ये
शिवसेनेला थोपविण्यासाठी आप निवडणुकीच्या रिंगणात ; प्रीती शर्मा मेनन यांच्यावर जबाबदारी

शिवाजी माने म्हणाले, "२०१९च्या सभेमध्ये मला उद्धव ठाकरे यांनी जुलमाचं शिव बंधन बांधलं. मी त्यांना शिवबंधन बांधा म्हणलो नव्हतो. ही तर सुरुवात आहे येणाऱ्या काळात अजून कित्येक जण शिवसेना सोडतील. माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने मी शिवसेना सोडली आहे,"

असा आहे शिवाजी माने यांचा राजकीय प्रवास

  • शिवाजी माने हे १९९६ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले. १२ व्या आणि १४ व्या लोकसभेत ते खासदार होते. २००६च्या दरम्यान त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर २००४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभवाचं खापर फोडत शिवसेना सोडली.

  • २००८ मध्ये ते काँग्रेसमध्ये आले. कॉग्रेसने त्यांना जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे बहुसंख्य जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले होते. त्यानंतर कॉग्रेसमध्ये राजीव सातव अ‍ॅक्टिव्ह झाले.

  • काँग्रेसमध्ये माने आणि सातव यांचे जमत नसल्याने माने यांनी २०१४ मध्ये कॉग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. २०१५च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने माने यांना एकही तिकीट दिलं नसल्याने माने पुन्हा नाराज झाले. त्यांनी २०१५ ते २०१९ पर्यंत ते राष्ट्रवादीत होते.

  • आमदार संतोष बांगर यांच्या प्रचारार्थ २०१९ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आखाडा बाळापूर येथे सभेसाठी आले असता त्यांनी भर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला होता. आता माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.