तीन तासांच्या चौकशीनंतर सोमय्या म्हणाले, सत्याचा विजय होईल

सलग चार दिवस सोमय्या (Kirit Somaiya) यांची चौकशी होणार आहे.
Kirit somaiya News, Mumbai police interrogated Kirit Somaiya News Updates
Kirit somaiya News, Mumbai police interrogated Kirit Somaiya News UpdatesSarkarnama

मुंबई: 'आयएनएस विक्रांत' साठी पैसे गोळा करुन घोटाळा केल्याचा आरोप भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर मुंबई पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांनी तीन तास चौकशी केली. या चौकशीनंतर सोमय्या यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली. मी पोलिसांना सर्व सहरार्य केले, असल्याचे सोमय्या म्हणाले. (Mumbai police interrogated Kirit Somaiya)

Kirit somaiya News, Mumbai police interrogated Kirit Somaiya News Updates
राज ठाकरेंनी आता कोणाची सुपारी घेतली, हे फडणवीसच सांगतील : पटोलेंचा टोला

आयएनएस विक्रांत प्रकरणी सोमय्या यांची मुंबई पोलिसांनी तीन तास चौकशी केली. 'मी या प्रकरणी पोलिसांनी सहकार्य केले. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. सत्याचा विजय होईल, असेही सोमय्या म्हणाले. सकाळी ११ वाजता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सोमय्या गेले होते. दुपारी दोन वाजता कार्यालयातून ते बाहेर पडले. आजपासून सलग चार दिवस सोमय्या यांची चौकशी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्या यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच, अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे त्यांची अटकेपासून सुटका झाली आहे. सोमय्या आणि राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

Kirit somaiya News, Mumbai police interrogated Kirit Somaiya News Updates
पवारांनी कर्नाटकात पाऊल ठेवताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार भेटीला

सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी पैसे गोळा करुन घोटाळा केला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. आयएनएस विक्रांतच्या नावाने जमा केलेले पैसे राज्यपाल भवनामध्ये पोहचले नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही माहिती समोर आली असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. त्याच प्रकरणात सोमय्या यांची चौकशी झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com