जमिनीवर झोपताना पाठीला त्रास होतो, बेड द्यावा! देशमुखांना 14 दिवसांची कोठडी

मनी लाँर्डिंग प्रकरणी ईडीने देशमुखांना अटक केली आहे.
Anil Deshmukh
Anil Deshmukhsarkarnama

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे 29 नोव्हेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. सोमवारी सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. दरम्यान, देशमुखांना पाठीचा त्रास असल्याने त्यांना जमिनीवर झोपताना वेदना होतात. त्यामुले बेडची मागणी मान्य करावी, अशी विनंत देशमुखांकडून न्यायालयात करण्यात आली आहे.

मनी लाँर्डिंग प्रकरणी ईडीने देशमुखांना अटक केली आहे. ते आतापर्यंत ईडीच्या (ED) कोठडीत होते. त्यांची कोठडी आज (ता. 15) संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. देशमुखांकडून न्यायालयात काही मागण्याही करण्यात आल्या आहे. देशमुखांचे वय व त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचे जेवण मिळावे, ही विनंती त्यांचे वकिल अनिकेत निकम यांनी न्यायालयात केली आहे.

Anil Deshmukh
एसटी संपाबाबत शरद पवारांचं मोठं विधान; विलीनीकरणावर मांडली रोखठोक भूमिका

त्याचप्रमाणे देशमुख यांना पाठीचा त्रास असल्याने त्यांना जमीनीवर झोपताना पाठीला वेदना होतात. त्या़चे वय आणि डाँक्टरांचा सल्ला लक्षात घेता बेडची मागणी मान्य करावी, असा अर्ज त्यांचे वकिल इंद्रपाल सिंह यांनी केला आहे. देशमुखांवर कारागृहात त्यांच्या खासगी डाँक्टरांचे मार्गदर्शन व उपचारासाठी तसेच औषध पुरवण्याबाबतही न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, मागील सुनावणीवेळी ईडीने या प्रकरणी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेची कस्टडी घेण्याचा प्रयत्न असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले होते. अनिल देशमुख आणि सचिन वाझे या दोघांची समोरासमोर चौकशी करायची असल्याने अनिल देशमुखच्या (anil deshmukh) ईडी कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी ईडीने ED)आज न्यायालयात केली होती. त्यानुसार तीन दिवस ईडी कोठडीत वाढण्यात करण्यात आली होती. ही कोठडी सोमवारी संपणार होती.

मागील सुनावणीवेळी देशमुखांनी न्यायाधीशांना लेखी पत्र दिलं होतं. ''दहा दिवसापासून ईडीनं मला कोठडीत ठेवलं आहे. या दरम्यान मला दोनशेहून अधिक प्रश्न विचारण्यात आले. मात्र जे ईडीला अपेक्षित आहे, त्यासंदर्भात माझ्याकडे आता सांगण्यासारखे काही नाही, त्यामुळे मला आता ईडीची कोठडी दिली जाऊ नये,'' अशी विनंती देशमुखांनी केली होती. पण त्यांची ही विनंती फेटाऴण्यात आली होती. ''सचिन वाझे याची कोठडी संपल्यानंतर दोघांची समोरासमोर चौकशी करता येईल. गरज पडल्यास त्यावेळी अनिल देशमुखांची कोठडीही नंतर न्यायालयाच्या परवानगीने घेता येईल. सचिन वाझे सध्या गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीत आहे, उद्या त्याची रिमांड वाढवली तर?,” असा सवाल देशमुखांचे वकील विक्रम चौधरी यांनी त्यावेळी उपस्थित केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com