महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के. शंकरनारायण यांचे निधन; भगतसिंह कोश्यारींकडून शोक व्यक्त

K Sankaranarayanan| २०१० ते २०१४ या काळात के. शंकरनारायण महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के. शंकरनारायण यांचे निधन; भगतसिंह कोश्यारींकडून शोक व्यक्त
K Sankaranarayanan passes away

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कटीकल शंकरनारायण अर्थात के. शंकरनारायण ( K Sankaranarayanan) यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. केरळ (Keral) येथील पालघाटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २०१० ते २०१४ या काळात के. शंकरनारायण महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.

के. शंकरनारायण हे कॉंग्रेसचे (Congree) जेष्ठ नेते होते. केरळ विधानसभेचे ते ४ वेळा सदस्य होते. केरळ सरकारमध्ये ते अर्थ, कृषी, उत्पादन शुल्क अशा विविध खात्यांचे मंत्री होते. महाराष्ट्राशिवाय नागालँड, झारखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गोवा या राज्यांचेही ते राज्यपाल होते. त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

K Sankaranarayanan passes away
कर्नाटकात हिजाबनंतर आता नवीन वादाला तोंड फुटलं ; हिंदू संघटना आक्रमक

माजी राज्यपाल कटीकल शंकरनारायणन यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. शंकरनारायणन हे लोकप्रिय नेते होते. केरळ विधानसभेचे दीर्घ काळ सदस्य राहिलेले शंकरनारायणन हे उत्तम प्रशासक होते. महाराष्ट्रातील आपल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी उच्च शिक्षण, मागास भागांचा विकास व आदिवासी विकास या विषयांमध्ये विशेषत्वाने लक्ष घातले.  आपल्या निःपक्ष वर्तनातून त्यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा वाढवली. दिवंगत शंकरनारायणन यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांची कन्या तसेच इतर आप्तेष्टांना कळवतो, अशा शब्दांमध्ये भगतसिंह कोश्यारी यांनी के. शंकरनारायण यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.