मिस्टर गुवाहाटी...काही तरी सोडा आमच्यासाठी; भाजप नेत्याचा थेट मुख्यमंत्र्यांनाच टोला

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांच्या नावाची घोषणा झाली.
BJP
BJP Sarkarnama

ठाणे : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांच्या नावाची घोषणा झाली. याचवरून भाजपचे माजी नगरसेवक व भाजप (BJP) नेते मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचे नीकटवर्तीय मंदार टावरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांना मिस्टर गुवाहाटी म्हणत काही तरी सोडा इथल्या भूमिपुत्रांच्या हाती. नाहीतर परत लढावे लागेल आमच्या अस्मितेसाठी अशी पोस्ट केली आहे. ठाणे जिल्ह्यातील कामासाठी आम्ही साताऱ्याला जायचे का? असा सवाल करीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे येथील मतदार संघातूनच द्यायला हवे होते. येथील भूमीपूत्र किंवा याच मतदार संघातील मंत्री, आमदार यांना मंत्रीपद द्यायला हवे. आम्हाला साताऱ्याला जायला लावू नका, ही आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

BJP
'त्या' वक्तव्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाणांनी गमावले?

त्यांच्या या पोस्टमुळे आता भाजपमधील नेत्यांची खदखद बाहेर येत आहे. ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी रविंद्र चव्हाण यांची वर्णी लागेल, असे भाजप कार्यकर्त्यांना वाट होते. मात्र, चव्हाण यांच्या ऐवजी देसाई यांच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मात्र, तावरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच टोला लगावल्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

कल्याण-डोंबिवलीतील (Kalyan-Dombivali) रस्त्यांवरुन चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर थेट निशाणा साधला होता. मंत्री चव्हाण यांच्या डोंबिवलीतील त्या वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज झाला. डोंबिवलीतील शिंदे गटासह ठाकरे गटाने देखील चव्हाण यांच्यावर रस्ते कामावरुन टिकेची झोड उठविली होती.

BJP
उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं : पालघर जिल्हाप्रमुखानंतर उपजिल्हाप्रमुखांचाही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चव्हाण यांच्या नावाची चर्चा असतानाच शंभूराजे देसाई यांच्या नावाची घोषणा झाली. शिंदे गटाची ही नाराजी चव्हाण यांना भोवली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या कामावरुन भाजप व शिंदे गटात शीत युद्ध सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in