मला 'परमसत्य' मांडायचंय! देशमुखांनी चांदीवाल समितीसमोरच टाकला बॉम्ब

चांदीवाल समितीसमोर सचिन वाझेच्या वकिलांनी आज अनिल देशमुखांची उलटतपासणी घेतली.
Param Bir Singh and Anil Deshmukh
Param Bir Singh and Anil DeshmukhSarkarnama

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या वकिलांनी आज देशमुखांची उलटतपासणी घेतली आहे. परमबीरसिंह यांच्याबाबत 'परमसत्य' मला मांडायचे आहे, असा बॉम्ब देशमुखांनी आज समितीसमोर टाकला.

देशमुखांनी सत्य मांडू द्यावे, अशी मागणी केल्यानंतर समितीने त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. ही प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला जे मत मांडाचे, ते मांडा, असे समितीने देशमुखांना सुचवले. या प्रकरणात पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांना साक्षीदार म्हणून बोलवावे, असा अर्ज सचिन वाझेने केला. समितीने हा अर्ज फेटाळून लावला. वाझेच्या वकिलांनी देशमुखांची आज उलटतपासणी घेतली.

वाझेची वकिलांनी देशमुखांची घेतलेली उलटतपासणी :

वकील - क्राईम इंटेलिजन्स युनिट (सीआययू) कुठल्या गुन्ह्यांचा तपास पुढाकार घेऊन करू शकते का? हे तुम्हाला माहिती आहे का?

देशमुख - पोलीस किंवा आयुक्तालयात नियम असून, त्यानुसार ते होते.

वकील - तुम्हाला ती नियमावली माहिती आहे का?

देशमुख - माहिती नाही

वकील - तुम्ही पोलीस आयुक्तालय किंवा तेथील नियमावली न पाहता तुमच्या अधिकारांचा वापर करून काही महत्वाचे गुन्हे सीआययूकडे वर्ग केले का?

देशमुख - मला माहिती नाही.

वकील - वाझे संदर्भातील अहवालातील मुद्द्याची प्रश्नावली भारंबे यांना कुणी दिली ?

देशमुख :- सचिन वाझे संदर्भातील प्रश्नावली मुंबई पोलीस आयुक्तालयाने तयार केली असावी. गृह सचिवांनी सचिन वाझेच्या नियुक्तीबद्दल तसेच, सीआययू प्रमुख नेमण्याबाबतची माहिती मागवली होती. त्या आधारे ही प्रश्नावली बनवली असेल.

वकील - गृह विभागाकडून प्रश्न निश्चित करण्यात आले होते का?

देशमुख : नाही

वकील : गृह सचिवांनी तुमच्या परवानगी किंवा तुम्हाला न विचारता मिलिंद भारंबेंना प्रश्न विचारले होते का?

देशमुख : मी याचे उत्तर यापूर्वी दिलं आहे

वकील - तुम्ही गृहमंत्री म्हणून या अहवालावर काही कारवाई केली का ?

देशमुख - मी कोणतीही कारवाई केली नाही. हा अहवाल ३० मार्चला तयार झाला. मला तो दोन ते तीन दिवसांनी मिळाला. मी 5 एप्रिलला गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुढे काय झाले मला माहीत नाही.

वकील - हेमंत नगराळे यांची पोलीस महासंचालकपदावरून मुंबई पोलीस आयुक्तपदी कुणी नियुक्ती केली ?

देशमुख - हो, नगराळे यांची आयुक्तपदी नियुक्ती केली. त्या दोन्ही पोस्ट समकक्ष आहेत

वकील - सचिन वाझे यांना अडकवण्यासाठीच नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदी बसवण्यात आले?

देशमुख : मी नाही केले.

Param Bir Singh and Anil Deshmukh
अन्वय नाईक आत्महत्या अन् पोलिसांच्या बदल्यांवरून देशमुखांची झाडाझडती

दरम्यान, सचिन वाझेने मुंबईचे पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांना चौकशीसाठी बोलवण्यात यावे, असा अर्ज केला होता. या अर्जाला देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांच्या वतीने विरोध दर्शवण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील संवादाविषयी परमबीरसिंह यांनी सादर केलेला व्हॉटसअॅपवरील मजकूर आणि परमबीरसिंह यांची बदली झाल्यानंतर त्यांनी पत्राद्वारे जाहीर केलेले आरोप याच्या परस्पर संबंधांची शहानिशा चांदीवाल समिती करीत आहे.

Param Bir Singh and Anil Deshmukh
अखेर ठरलं! माजी मुख्यमंत्री राणे विरुद्ध सूनबाई अशीच लढत

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटके असलेली मोटार सापडली होती. याप्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची राज्य सरकारने बदली केली होती. या बदलीनंतर परमबीरसिंह यांनी थेट गृहमंत्र्यांकडून पैसे वसुलीसाठी दबाव असल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती. या सर्व आरोपांची चौकशी चांदीवाल समिती करीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com