पंचतारांकित 'हॉटेल ताज लॅन्ड्स एन्ड'मध्ये झुरळासह मुदतबाह्य अन्न पदार्थ; एफडीएचा कारवाईचा बडगा

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झुरळ सापडले असून, अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईत हा प्रकार समोर आला आहे.
food drugs administration orders closure of storage rooms of taj lands end
food drugs administration orders closure of storage rooms of taj lands end

मुंबई : बांद्रा येथील ताज लॅन्ड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) कारवाई केली आहे. हॉटेलमधील मुदतबाह्य अन्नसाठा नष्ट करुन साठवणूक कक्षातील झुरळांचा प्रादुर्भाव दूर होईपर्यंत साठवणूक कक्ष बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंचतारांकित हॉटेलवर झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. 

राज्यातील जनतेच्या आरोग्याची हिताची जबाबदारी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई सुरू आहे. या कारवाईचा भाग म्हणून मुंबईतील बांद्य्रामधील नामांकित पंचतारांकित हॉटेल मे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ताज लॅन्ड्स एन्ड या हॉटेलची 3 मार्चला एफडीएकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीत हॉटेलमधील अन्न पदार्थ साठविण्याच्या काही फ्रीजवरील तापमान निदर्शक यंत्रणा आढळून आली नाही. 

तसेच, हॉटेलच्या साठवणूक कक्षात गोडा, चिज, वॉटरमेलन ज्यूस, इडलीचे पीठ, फळाचे रस, ग्रीन ॲपल आदी अन्न पदार्थांचा मुदतबाह्य साठा अन्न पदार्थ तयार करण्यासाठी केल्याचे आढळून आले. तसेच, मुख्य किचन मधील अन्न पदार्थ साठवणूक कक्षात झुरळांचा प्रादुर्भाव आढळून आल्याने हा साठवणूक कक्ष झुरळांचा प्रादुर्भाव दूर होईपर्यंत बंद करण्याचे तात्काळ निर्देश देण्यात आले. तसेच, मुदतबाह्य अन्न पदार्थाचा साठा तात्काळ जनआरोग्याच्या हितार्थ नष्ट करण्यात आला व पुढील कारवाई अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत करण्यात येत आहे.

ही कारवाई पंचतारांकित तसेच, इतर हॉटेलांच्या तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे अन्न सुरक्षा अधिकारी जी.एम. कदम, अन्न सुरक्षा अधिकारी यो.सु.कणसे व एम.एन.चौधरी, सहायक आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई यांनी शशिकांत केकरे सहआयुक्त (अन्न) बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com