नियम पाळा, नाहीतर लॉकडाऊन अटळ!

केंद्र सरकार आणि राज्य सरकार तिसरी लाट रोखण्याच्या तयारीत आहे
Lockdown/ kishori pedanekar 

Lockdown/ kishori pedanekar 

मुंबई : 'लॉकडाऊन (lockdown) नको असेल तर नियम पाळा, मास्क घाला, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. ज्या दिवशी शहरात 20 हजारांहून अधिकचा आकडा पार होईल त्या दिवशी शहरात लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊन लागू केला जााईल. असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) यांनी दिला आहे. तसेच, ज्या इमारतीत २० टक्क्यांहून अधिक रुग्ण आढळतील ती इमारत पूर्णपणे सील करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

कोरोना विषाणूचा नवा ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या (Omicron Variant) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असताना नागरिकांनी खबरदारी घेण्याचे किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. सोमवारी मुंबई महापालिकेने घेतलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कौतुक केले.

<div class="paragraphs"><p>Lockdown/ kishori pedanekar&nbsp;</p></div>
'जेव्हा लढायची वेळ होती तेव्हा OBC लढले नाहीत'

कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने राज्य सरकारचीही चिंता वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता निर्बंध लावण्यात आले आहेत. 'केंद्र सरकार आणि राज्य सरकार तिसरी लाट रोखण्याच्या तयारीत आहे. पण लोकांनी घाबरुन जाई नये, आपण दुसऱ्या लाटेला देखील हरवले होते. पण लोकांनी लस घ्यावी, मास्क लावावा, गर्दीत जाणे टाळावे. नियम पाळले तरच आपण कोरोनाला हरवू शकू, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच, आपण ओमिक्रॉन आणि कोरोना विषाणू विरुद्ध पुन्हा लढा सुरु केला आहे. लोकांनी हे समजून घ्यावे आणि गर्दीच्या ठिकाणी टाळावे. लॉकडाउन कोणालाही नको आहे, परंतु आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे आणि गर्दी टाळली पाहिजे. नेते असोत की जनता सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे. लोकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी करावी लागेल. मी स्वतः लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करत आहे. मुलांना लस देण्यास पालकांनीही मनाई करू नका. नागरिकांनी दोन डोस घेतलेले असावेत. शिवसेनेने गर्दी टाळण्यासाठी वांद्र्यातील जत्रेचा शो बंद केला आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली आहे.

<div class="paragraphs"><p>Lockdown/ kishori pedanekar&nbsp;</p></div>
प्रदीप कंद यांचा पुणे जिल्हा बँक निवडणुकीत विजय, जल्लोषात मिरवणूक,पाहा व्हिडिओ

आता इतर पक्षाच्या नेत्यांनीही संसर्ग टाळण्याच्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. आपल्या कार्यकर्त्यांचा आणि लोकांचा बळी जाऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. ५०% उपस्थिती असेल तरच मी समारंभात येईन, असं अजित पवारांनी म्हटलं आहे, त्यामुळे सुपरस्प्रेडर होऊ नये म्हणून काळजी घ्या, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in