बिहारी अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्यापेक्षा कोरोनावर लक्ष द्या : साटम 

मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त इक्‍बालसिंह चहल हे लोकप्रतिनिधींच्या पत्रांची दखल घेत नसल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे मुंबई सरचिटणीस तथा आमदार अमित साटम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बिहारहून येणाऱ्या तपासी अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात महापालिका आयुक्त गुंतले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Focus on corona rather than quarantining Bihari authorities: Satam
Focus on corona rather than quarantining Bihari authorities: Satam

मुंबई : मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त इक्‍बालसिंह चहल हे लोकप्रतिनिधींच्या पत्रांची दखल घेत नसल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे मुंबई सरचिटणीस तथा आमदार अमित साटम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बिहारहून येणाऱ्या तपासी अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात महापालिका आयुक्त गुंतले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

अनलॉकिंग सुरु झाले असताना मुंबई शहरात अजूनही मृत्यूदर मोठा आहे, त्यामुळे कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. मुंबईत जुलै महिन्यातही कोरोनामुळे रोज सरासरी 58 बळी गेले आहेत. जाणकारांनी वारंवार सांगूनही महापालिका प्रशासनाने जुलैत फारच कमी म्हणजे फक्त एक लाख 98 हजार 321 चाचण्या केल्या आहेत. याचाच अर्थ महापालिकेने जुलै महिन्यात रोज सरासरी फक्त सहा हजार 397 चाचण्या केल्या आहेत. त्यातल्या 30 हजार अँटीजेन चाचण्या वगळल्या तर ही सरासरी फक्त पाच हजार येते, असेही साटम यांनी सांगितले आहे. 

मुंबईतील मृत्यूदर अजूनही पाच टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असताना व अनलॉकिंग सुरु झाले असताना चाचण्यांची संख्या वाढवून ती रोज 10 हजार करण्याची गरज आहे. अन्यथा मुंबईत अचानक एखादे दिवशी रुग्णसंख्या उफाळून येईल, अशी भीतीही आमदार अमित साटम यांनी महापालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. ता. 31 जुलैपर्यंत मुंबई शहराचाचा कोरोना मृत्यूदर 5.55 टक्के (30 जूनपर्यंतचा दर 5.89 टक्के) असल्याचेही त्यांनी दाखवून दिले आहे. 

याच मुद्यावर मी आपल्याला वारंवार पत्रे लिहूनही आपण त्याची दखल घेतली नाहीत. आपल्याला रोज मोठ्या संख्येने पत्र येत असतील, मात्र लोकप्रतिनिधींच्या पत्रांची तुम्हाला पर्वा नाही, असे दिसते आहे. बहुदा इतर राज्यांमधून कामासाठी मुंबईत येत असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात तुम्ही गुंतलेले असाल, असे वाटते. त्यापेक्षा तुम्ही तेवढेच लक्ष कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढविण्यावर दिलेत तर मुंबई शहर अधिक सुरक्षित राहील, असाही टोला साटम यांनी लगावला आहे. तुम्हाला लोकप्रतिनिधींच्या पत्रांची पर्वा नसली तरी शहरवासियांच्या हितासाठी मी हे मुद्दे तुमच्यासमोर मांडतच राहणार, असेही आमदार अमित साटप यांनी आयुक्त चहल यांना म्हटले आहे. 

हेही वाचा : नारायण राणे टीआरपीसाठी काहीही बोलतात 

जळगाव : राज्याचे माजी मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्याकडे सध्या कोणतेही काम नाही, ते बेरोजगार आहेत. त्यामुळे त्यांना आपले महत्व वाढविण्याची गरज आहे. स्वतःचा टी. आर. पी. वाढविण्यासाठी ते काहीही बोलत असतात, अशी टीका राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. 

मंत्री पाटील जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.  कोकणातील नाणार प्रकल्पा संदर्भात नारायण राणे यांनी वक्तव्य करताना पैसे कमविणे हा शिवसेनेचा धंदा आहे, असा आरोप केला होता.

त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, नारायण राणे यांच्याकडे सध्या कोणतेही काम नाही. ते सद्यस्थितीत बेरोजगार आहेत. हेच नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणमध्ये कोणताही प्रकल्प कधीही नेला नाही. त्यामुळे त्यांना कशावरही बोलण्याचा अधिकार नाही. मात्र, सध्या ते केवळ बोलत असतात आणि बोलण्यातूनच आपले महत्व वाढवून घेत असतात. त्यामुळे असे वक्तव्य करून ते आपला टीआरपी वाढवून घेत असतात. त्यांच्या बोलण्याला आता कोणतेही महत्व नाही. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com