फुल,भाजी विक्रेता ते आमदार... रमेश लटकेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास

त्यांच्या सामाजिक कामाची चर्चा ही 'मातोश्री'पर्यंत पोहचली आणि त्यांना १९९७ साली थेट मुंबई पालिकेचे तिकीट मिळाले.
फुल,भाजी विक्रेता ते आमदार... रमेश लटकेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास
Ramesh Latke Latest News, Ramesh Latke passed away Sarkarnama

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना (Shivsena) आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे काल सायंकाळी निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते. आमदार लटके दुबईत कुटुंबियांसह फिरायला गेले असतानाच काल त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार लटके हे शिवसेनेचे सलग दोन वेळचे आमदार होते. (Ramesh Latke Death Marathi news)

Ramesh Latke Latest News, Ramesh Latke passed away
लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा; आठवडाभरात मिळू शकतो डिस्चार्ज

आमदर रमेश लटकेंचा राजकीय प्रवास

आमदार रमेश लटके हे मुळ शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई जवळच्या शेंबवणे पैकी धुमाकवाडी या छोट्या गावातील होते. मुंबईत कामानिमित्त त्यांचे वडिल आले होते. तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांसोबत मुंबईत काम करायला सुरुवात केली. यामध्ये दुधाचा व्यवसाय, फुलांच्या माळा, भाजी विक्रीचे काम सुरूवातीला त्यांनी केले. यातून त्यांचा जनसंपर्क वाढत गेला. याच जनसंपर्काच्या जोरावर सुरूवातीला शिवसेना शाखा प्रमुख म्हणून त्यांनी काम केले.

त्यांच्या केलेल्या सामाजिक कामाची चर्चा ही मातोश्रीपर्यंत पोहचली आणि त्यांना १९९७ साली थेट मुंबई पालिकेचे तिकीट मिळाले. तेव्हा ते विजयी होवून पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतरच्या २००२ आणि २००७ या निवडणुकांमध्येही लटकेंनी विजय मिळवत महापालिका सभागृहात काम केले, असे त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे सलग तीनदा नगरसेवक होते. स्थायी समिती सभापती, बेस्ट अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.

Ramesh Latke Latest News, Ramesh Latke passed away
मंत्रालय हादरले : मंत्र्याला सांगुनही बिल नाही, ठेकेदाराचा कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत लटके यांच्या कामाची दखल घेत त्यांना पक्षाने विधानसभेचे तिकीट दिले. भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा पराभव करून रमेश लटकेंनी आमदार म्हणून विधानसभेत पहिल्यांदा प्रवेश केला. त्यानंतर पुढच्या २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आणि त्यांना सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले होते. असा थक्‍क करणारा लटके यांचा राजकीय प्रवास आहे. याचबरोबर बांधकाम आणि हॉटेल व्यवसायातही त्यांनी आपला जम बसविला होता.

Ramesh Latke Latest News, Ramesh Latke passed away
चंद्रकांतदादांचा पुण्यात राष्ट्रवादीसह मनसेला दे धक्का!

दरम्यान, त्यांच्या निधनाची माहिती शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कळवली. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून त्यांचे पार्थिव लवकरच मुंबईत आणलं जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.