Ravindra Dhangekar: आधी शिवसेना, मग मनसे, आता काँग्रेस, यापुढे कोणता पक्ष? धंगेकरांनी स्पष्टच सांगितलं...

Matoshri: 'मातोश्री'वरील श्रद्धा कायम राहणार
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama

Maharashtra Politics: कसबा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर आज रवींद्र धंगेकर यांनी उद्धव ठाकरे यांची आभार भेट घेतली. यावेळी त्यांनी 'मातोश्री'शी असलेले ऋणानुबंध उलगडले. कुठलाही राजकीय वारसा नसताना शिवसेनाप्रमुखांनी दाखविलेल्या विश्वासामुळे महापालिकेत दोन वेळा नगरसेवक झालो. 'मातोश्री'बाहेर तासंतास, दिवसदिवस उभा राहिलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मातोश्री, ठाकरे आणि पुण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याचे रवींद्र धंगेकरांनी सांगितले.

'मतोश्री'वर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला राजकीय प्रवास उलगडला. धंगेकर म्हणाले, "माझ्या राजकीय, सामाजिक जीवनाची जडणघडण शिवसनेतून झाली. शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक आणि आता काँग्रेसचा आमदार झालो आहे. सुरवातीच्या काळात शिवसेनाप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली कामास सुरुवात केली. राजकीय घराणं नसताना, मला चेहरा नसताना शिवसेनाप्रमुखांमुळे महापालिकेचा दोन वेळा नगरसेवक झालो होतो."

Ravindra Dhangekar
Satej Patil : विधान परिषदेत गाजले, पिंपळखुटी चेकपोस्ट मिर्झांचा प्रश्‍न; अन् सतेज पाटील आक्रमक !

आता काँग्रेसमध्ये असलो तरी मातोश्रीवर श्रद्धा असल्याचे धंगेकरांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, "मातोश्रीबाहेर तासंतास, दिवसदिवस उभा राहिलेला मी कार्यकर्ता आहे. माझा प्रवास काँग्रेसमध्ये गेला असला तरी मातोश्री, ठाकरे कुटुंब आणि पुण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी माझे सलोख्याचे संबंध आहेत. मातोश्री माझे घर होते, त्यावर माझी श्रद्धा आहे. यावेळी उमेदवारी देतानाही उद्धव ठाकरेंनी शिफारस केली. तसेच महाविकास आघाडीकडून लढताना काही कमी पडू देणार नाही. मतोश्रीचे दार तुझ्यासाठी उघडे असतील अशी ग्वाहीही त्यांनी दिली."

Ravindra Dhangekar
Nagar News : नगरमध्ये आघाडीला धक्का : एका रात्रीत खेळ पलटला; थोरात-पवारांची काल बैठक अन् आज चार मते फुटली

आधी शिवसेना, मग मनसे आता काँग्रेस पक्षाचे आमदार. यापुढे कोणता पक्ष, असा प्रश्न यावेळी धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टच उत्तर दिले. धंगेकर म्हणाले, "शिवसेना आणि भाजपच्या युतीत कसबा कायम भाजपच्या वाट्याला गेला होता. त्यामुळे आम्ही काही लोक आपोपच बाहेर फेकलो जायचो. आता मी काँग्रेसमध्ये कसा ओढला गेलो, माहिती नाही. पण काँग्रेसमधून सर्वांचे आशीर्वाद मिळत आहे. त्यामुळे आता मी काँग्रेसमध्ये रमलो आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in