
UPSC Result 2023 : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऋचा कुलकर्णी हिने नागरीसेवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात इंडियन रिव्हन्यू सर्व्हिस (आआरएस)मध्ये वर्णी लागली. मात्र आयएएस होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. त्या स्वप्नाला ऋचाने दुसऱ्याच प्रयत्नात गवसणी घातली. या यशाबद्दल तिचे राज्यभरातून कौतुक होत आहे. UPSC CSE Final Result
केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (UPSC) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल मंगळवारी (ता. २३) जाहीर झाला. त्यात ऋचा कुलकर्णी हिने राज्यात दुसरी तर देशात ५४ वी रँक मिळवत उतीर्ण झाली आहे. या निकालाने ऋचाचे 'आयएएस' होण्याचे स्वप्न साकार झाले आहे.
ऋचाचे वडील हैदराबाद येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. तिची आई शास्त्रज्ञ आहे. ऋचाने 'बीटेक'मधून २०२० मध्ये पदवी घेतली. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता तिने 'यूपीएससी'च्या (UPSC) तयारीला सुरूवात केली. यासाठी तिने कुठल्याही खासगी क्लासची वाट धरली नाही. स्वतः अभ्यास करून ऋचाने परीक्षा दिल्या. ऋचा पहिल्याच प्रयत्नात देशात १३४ रँक मिळवत 'यूपीएससी' परीक्षा उतीर्ण झाली. त्यानुसार त्यांनी भारतीय नागरीसेवेत 'आयआरएस' म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. UPSC IAS Exam
दरम्यान, 'यूपीएससी'ची तयारी सुरु करतानाच ऋचाने 'आयएएस' होण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यासाठी तिने 'आयआरएस' असताना दुसरा प्रयत्न देण्याचे ठरविले. त्यानुसार पुन्हा तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रयत्नात ऋचा ५४ व्या रँकने 'यूपीएससी' उतीर्ण होऊन राज्यात दुसरी आली आहे. या निकालाने ऋचाने 'आयएएस' (IAS) होण्याचे स्वप्न पूर्ण केल्याचे तिचे वडील डॉ. जयंत कुलकर्णी यांनी सांगितले.
प्राध्यापक असलेले डॉ. जयंत कुलकर्णी म्हणाले, "मुलांनी आपल्या क्षमता, कल ओळखावा. त्याला जिद्दीची आणि मेहनतीची जोड द्यावी. 'यूपीएससी'ची तयारी करणाऱ्या मुलांनी परीक्षेचे स्वरुप समजून घ्यावे. त्यानुसार अभ्यासाची योजना आखावी."
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.