Yogesh Kadam Latest News
Yogesh Kadam Latest NewsSarkarnama

शिंदे गटाला पहिला झटका; बंडखोर आमदार योगेश कदम माघारी फिरण्याच्या वाटेवर

Yogesh Kadam : संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका..मी शिवसैनिक!

गुवाहाटी : शिवसेना नेते (Shiv Sena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासोबत सुमारे 40 आमदार गुवाहाटीत गेले आहेत. आता या बंडखोर आमदारांचा गट भाजपात सहभागी होणार, अशा चर्चा सुरू झाल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. या पार्श्वभू्मीवर शिंदे गटात सहभागी झालेले दापोलीचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी ट्विट करत मी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार नसून काल आज आणि उद्या मी शिवसेनेतच असणार, असे ट्विट करत मतदारसंघातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

Yogesh Kadam Latest News
एकनाथ शिंदेंचा अभ्यास कमी पडला : 38 आमदार जमवूनही `टेन्शन` गेले नाही...

कदम आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, सप्रेम जय महाराष्ट्र, मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही. मुळात तशी गरज ही पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणातात की, ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका..मी शिवसैनिक!, असे ट्विट कदम यांनी केले आहे.

योगेश कदम हे शिवसेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत. ते नाराज असल्याने शिंदे गटात सहभागी झालेले आहेत. दरम्यान, योगेश कदमांनी मी भाजपमध्ये सहभागी होणार नाही. अशी भूमिका घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. याचे कारण असे की, शिंदे गट हा भाजपात सहभागी होणार किंवा प्रहार जनशक्ती पक्षात सहभागी होणार अश्या चर्चा आज दिवसभर सुरू होत्या. दरम्यान, कदमांनी काहीवेळापुर्वीच आपली भुमिका ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त करत आपल्या मतदारसंघातील मतदारांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट करत शिवसेनेतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिंदे गटात सर्वकाही आलबेल नाही. असे यावरून दिसत आहे. यामुळे हा शिंदे गटाला पहिला झटका म्हणावा लागेल.

Yogesh Kadam Latest News
'बंडखोर आमदारांना जेवणातून गुंगीचे औषध दिलं जातयं'

दरम्यान, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी बंडखोर आमदारांनी वेगळा गट बनवला असल्याने त्यांना निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्षात सहभागी व्हावे लागेल. अशावेळी भाजपा किंवा प्रहार हे दोन पर्याय त्यांच्याकडे आहेत असं सांगितले होते. यावर आज शिंदे गटात चर्चा झाली असावी आणि काही आमदारांनी भाजपमध्ये सहभागी होण्यास नकार दिला असल्याची शक्यता कदमांच्या ट्विटवरून दिसत आहे. आता शिंदेचे बंड राज्याच्या राजकारणात अजून काय उलथापलथ घडवते हे बघणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com