एकनाथ शिंदेंना ठाण्यात पहिला झटका; माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

ठाणे शहरातील निष्ठावंत शिवसैनिकांवर महापालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने गुन्हे दाखल करण्याचा प्रकार वाढला आहे.
Shivsena-Eknath Shinde
Shivsena-Eknath ShindeSarkarnama

ठाणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर ठाण्यातील (Thane) तब्बल ६६ माजी नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे आहेत, असा दावा माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केला होता. मात्र, त्यांच्यातील गटबाजी हळूहळू चव्हाट्यावर येऊ लागली आहे. ठाणे शहरातील निष्ठावंत शिवसैनिकांवर महापालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने गुन्हे दाखल करण्याचा प्रकार वाढला आहे. या प्रकारामुळे दुःखी होत घोडबंदर भागातील माजी नगरसेवक नरेश मणेरा, तसेच दिव्यातील माजी नगरसेविका अंकिता पाटील हे दोघे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदे यांना पहिला झटका मानला जात आहे. (First blow to Eknath Shinde in Thane; Former corporator joins Shiv Sena)

Shivsena-Eknath Shinde
शिंदे गटात शह-कटशह : कोकाटे, ठोंगे, साठेंच्या निवडीनंतर सावंत गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव

शिवसेनेच्या ६७ माजी नगरसेवकांपैकी नंदिनी विचारे वगळता ६५ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात डेरेदाखल झाले आहेत, माजी महापौर म्हस्के यांनी जाहीर केले आहे. माजी नगरसेवक नरेश मणेरा हे त्या वेळी आजारी होते. पण, तेही शिंदे गटासोबतच आहेत, असे त्या वेळी स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, मणेरा यांनी खासदार राजन विचारे यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्या भेटीनंतर आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे ट्विट करून त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्यासोबत उपविभागप्रमुख माया पाटील, ओवळा माजिवडा चिटणीस नटेश, शाखाप्रमुख जयवंत पाटील, भरत शेळके यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Shivsena-Eknath Shinde
पृथ्वीराज चव्हाणांना त्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी बोलूही दिले नाही!

शिवसेनेच्या वागळे येथील नगरसेवकांनाच गेली अनेक वर्षे महत्त्वाची पदांचे वाटप करण्यात आलेले आहे. शहराच्या इतर भागांवर मात्र अन्याय करण्यात आलेला आहे. आमच्यावर निधीवाटपतही नेहमीच अन्याय करण्यात आला आहे, तसेच कारभारात कधीही विश्वासात घेतले गेलेले नाहीत. याशिवाय सुमारे नऊ- १० वर्षांपूर्वी घर बांधलेल्या शिवसैनिकांच्या विरोधात एमआरटीपी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याला वैतागून या भागातील गावकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक असून आगामी काळातही शिवसेनेसोबतच राहणार आहे, असे मणेरा यांनी जाहीर केले आहे.

Shivsena-Eknath Shinde
उंटावरून विजयी मिरवणूक काढणाऱ्या सांगोल्याचा खासदार नाईक निंबाळकरांना विसर

दिव्यातूनही शिंदे गटाला आव्हान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिव्यातूनही आव्हान देण्यात आलेल आहे. या भागातील शिवसेनेच्या माजी नगरसेविका अंकिता पाटील यांनी आपली निष्ठा मातोश्रीसोबतच असल्याचे स्पष्ट कले आहे. शिवसेना भवनात जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अंकिता पाटील यांनी भेट घेतली. आपण शिवसेनेसोबत कायम असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दिव्यातून शिवसेनेचे आठ नगरसेवक निवडून आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com