संदीप देशपांडेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अटकेसाठी पोलिसांचा शोध सुरु

Sandeep Deshpande | MNS | पोलिसांसमोर पळून जाणे संदीप देशपांडेंना महागात!
Sandeep Deshpande
Sandeep DeshpandeSarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेत संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्याविरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवतीर्थबाहेर पळून जाताना पोलिसांशी झालेल्या झटापतीत एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची दखल काल राज्याच्या गृहमंत्रालयाने देखील घेतली होती. देशपांडे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी दिले होते. ते म्हणाले, मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी आज मुंबई पोलीस दलातील महिला अधिकारी यांचेशी केलेल्या गैरवर्तनाची माहिती मी घेतली असून सदरच्या घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या इशाऱ्यानंतर राज्यभरातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी सकाळी मशिदींमध्ये भोंग्यांविना नमाज झाले. आता एक वाजताचे नमाज पठण असून त्याआधी पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनाही पोलीस ताब्यात घेणार होते. पण राज ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या शिवतीर्ताबाहेरून देशपांडे हे पोलिसांच्या ताब्यातून निसटले. (MNS Sandeep Deshpande Latest News Updates)

यावेळी एक महिला कर्मचारी जखमी झाल्या आहेत. संदीप देशपांडे हे सकाळी शिवतीर्थावर आले होते. याठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून येणाऱ्या कार्यकर्त्यांना तिथून जाण्यास सांगितले जात आहे. देशपांडेही तिथे आले होते. पोलीस त्यांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी माध्यमांशी बोलल्यानंतर पोलीस त्यांना घेऊन वाहनात बसवण्यासाठी नेत होते.

Sandeep Deshpande
संदिप देशपांडेच्या अडचणीत वाढ; पोलिसांसमोर पळून जाणे महागात पडणार!

देशपांडेंभोवती पोलिसांसह माध्यमांच्या प्रतिनिधींचाही गराडा होता. पण तेवढ्यात देशपांडेंच्या वाहनचालकाने त्यांची गाडी पोलिसांच्या वाहनाजवळ आणून उभी केली. पोलिसांची नजर चुकवून देशपांडे आपल्या गाडीत बसले आणि चालकाने थेट गाडी पुढे नेली. हे लक्षात येता पोलीस गाडीच्या मागे धावले पण तोपर्यंत गाडी निघून गेली होती. आता पोलीस देशपांडे यांचा शोध घेत आहेत.

मी निर्दोष : संदीप देशपांडे

संबंधित महिला पोलिसाला आमचा स्पर्शही झाला नाही. मला पकडण्यासाठी पुरुष अधिकारी उपस्थित असताना ती तिथे काय करत होती, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. देशपांडे यांनी एका व्हिडीओद्वारे आपली बाजू मांडली. देशपांडे यांचा सध्या पोलिस शोध घेत आहेत. मी पळून गेलो नाही. सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून आमच्यावर खोटे गुन्हे टाकले जातात. सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य बाहेर येईल, असेही देशपांडे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com