कोणाच्या नातवाचा सातबारा खराब होतोय, हे शोधा...

श्री. ढोबळे म्हणाले, राजर्षी शाहू राजांनी आरक्षण लागू केले. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या वाटेचा महामार्ग केला. आत्ता मराठी समाजाच्या आरक्षणासाठी राजाला रस्त्यावर उतरावे लागत आहेत.
कोणाच्या नातवाचा सातबारा खराब होतोय, हे शोधा...
Find out whose grandson's Satbara is going bad ...

मुंबई : ओबीसींची लिस्ट मागितली ती दिली नाही, त्यामुळे ओबीसी समाजाच नुकसान झालं आहे. नुकसान याने केलं की त्यानं केलं, अशी ढकला ढकली करण्यापेक्षा, ओबीसी समाजाची जनगणना केल्यानंतर कुणाच्या नातवाचा सातबारा खराब होतोय, हे विरोध करण्यापेक्षा त्यांनी एकदा शोधून काढावं, असा घणाघात माजी मंत्री व बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांनी केला आहे. Find out whose grandson's Satbara is going bad ...

अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त श्री. ढोबळे यांची 50 कार्यकर्त्यांसह 18 जुलैपासून 'नवनिर्धार संवाद यात्रा' राज्यभरात सुरु आहे. नंदूबारपासून सुरु झालेल्या या संवाद यात्रे दरम्यान, 28 जिल्ह्यातील मातंग वस्त्यांवर त्यांनी भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या आहेत. या यात्रेचा समारोप घाटकोर येथील चिरागनगर येथे रविवारी (ता. पाच) होणार आहे. ही यात्र आज कल्याणमध्ये दाखल झाली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.

श्री. ढोबळे म्हणाले, राजर्षी शाहू राजांनी आरक्षण लागू केले. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या वाटेचा महामार्ग केला. आत्ता मराठी समाजाच्या आरक्षणासाठी राजाला रस्त्यावर उतरावे लागत आहेत. सर्व समाजाला आरक्षण मिळावे ही आमची एकमुखी मागणी आहे. त्यांना आरक्षण दिल्यास आमच्या आरक्षणाच्या वाट्यात कुठेही फरक पडत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. 

श्री. ढोबळे म्हणाले, ओबीसींची लिस्ट मागितली ती दिली नाही, त्यामुळे ओबीसी समाजाच नुकसान झालं आहे. नुकसान याने केलं की त्यानं केलं, अशी ढकला ढकली करण्यापेक्षा, ओबीसी समाजाची जनगणना केल्यानंतर कुणाच्या नातवाचा सातबारा खराब होतोय, हे विरोध करण्यापेक्षा त्यांनी एकदा शोधून काढावं, असा घणाघातही त्यांनी केला.
.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in