`आदित्य ठाकरे यांना डिवचल्यामुळे माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल`

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी ही इन कॅमेरा सुरू आहे.
`आदित्य ठाकरे यांना डिवचल्यामुळे माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल`
Nitesh Rane-Aditya Thackeraysarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर कणकवलीत जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अडचणीत आलेले भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना आज मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) दिलासा मिळाला आहे. राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होईपर्यत त्यांच्यावर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी आज कणकवली पोलिसांनी दिली आहे.

Nitesh Rane-Aditya Thackeray
जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण? निवडीच्या 24 तास आधी नाराज तेली राणेंच्या भेटीला

नितेश राणे आणि संदेश सावंत यांनी याप्रकरणी केलेल्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. केवळ राजकीय वैमनस्य ठेऊन आणि विधानसभेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना डिवचल्यानंतर माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या (Sindhudurg DCC Bank) निवडणूक प्रचारामध्ये मला दूर ठेवण्यासाठी हा खोटा आरोप करण्यात आला आहे, असा युक्तिवाद ॲ नितीन प्रधान यांनी राणे यांच्या वतीने केला. या प्रकरणानंतर राणे यांना धडा शिकविणार असल्याचे सेना नेते म्हटल्याचे राणेंच्या वकिलांनी सांगितले. 18 नोव्हेंबरला घटना घडली, 23 नोव्हेंबरला राणेंकडून Cat calling झाले आणि 24 तारखेला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले, असा घटनाक्रम वकिलांनी मांडला. गुरुवारी (ता. १३) दुपारी पुन्हा न्या. सी. व्ही. भडंग यांच्यापुढे सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयातून सुनावणीवेळी सर्व पत्रकारांना न्यायालयातून बाहेर काढून टाकण्यात आले.

Nitesh Rane-Aditya Thackeray
नितेश राणेंच्या जामिनावर निर्णय नाहीच; कधीही होऊ शकते अटक

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेचे प्रचारक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, अशी फौजदारी फिर्याद कणकवली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज यापूर्वी फेटाळला आहे. त्यामुळे आता त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. दरम्यान, बँकेच्या निवडणुकीत राणे गटाला बहुमत मिळाले आहे. बॅंकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता गुरूवारी (ता. 13) रोजी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in