नेम सोमय्या, दरेकरांवर; पण ACB च्या जाळ्यात अडकला दुसराच भाजप नेता

भाजपचे (BJP) माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे.
नेम सोमय्या, दरेकरांवर; पण ACB च्या जाळ्यात अडकला दुसराच भाजप नेता
Narendra Mehtasarkarnama

भाईंदर : भाजपचे (BJP) माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्याविरोधात गैरमार्गाने संपत्ती जमा केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मेहता यांच्या विरोधात सर्व ज्ञात स्रोतातून मिळवलेल्या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मेहता यांच्या पत्नी सुमन मेहता यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रतिबंधक विभागाच्या दोन पथकांकडून मेहतांच्या घर व कार्यालयात तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे आणखी एक नेते अडचणीत आले आहे.

महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारो सुरु आहेत. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या, आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर विविध आरोप झाले आहेत. दरेकर यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. मात्र, त्यांना न्यायालयाने दिला दिला आहे. मात्र, या वादात आता एसीबीच्या जाळ्यात नरेंद्र मेहता अडकले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या हातात आयताच मुद्दा आला आहे.

Narendra Mehta
मोठा वाद होण्याची चिन्हे : परप्रांतीय ओबीसींचीही गणना करा, सरकारची मागणी!

मिरा-भाईंदरचे आमदार मेहता यांनी लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून उत्पन्नापेक्षा अधिकची संपत्ती जमविल्याप्रकरणी २०१६ मध्ये लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुल्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी (ता. १९) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू होती. एसीबी पथकाची ही चौकशी पूर्ण झाली असून याप्रकरणी त्यांनी नरेंद्र मेहतांवर नवघर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे लाचलुचपत विभागाच्या दोन पथकाकडून मेहतांच्या घर व कार्यालयावर धाड टाकण्यात आली आहे. हे सर्च ऑपेरशन गुरुवारी रात्रीपर्यंत सुरू होते. मात्र, त्यांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले का, याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, जानेवारी २००६ ते ऑगस्ट २०१५ या कालावधीत नगरसेवक व आमदार असताना अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करून मेहता यांनी उत्पन्नापेक्षा ८ कोटी २५ लाख ५१ हजार ७७३ रुपये इतक्या रकमेची असंपदा जमवल्याचे एसीबीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Narendra Mehta
पुणे जिल्ह्यावर काळाचा घाला : चासकमानमध्ये ४ विद्यार्थी तर भाटघर धरणात ५ महिलांचा बुडून मृत्यू

मेहता हे सर्वप्रथम २००२ मध्ये मिरा-भाईंदर महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २००७ मध्ये ते महापौरपदी विराजमान झाले. मेहता यांनी २००९ मध्ये भाजपत प्रवेश केला आणि मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, त्यात ते थोड्या फरकाने पराभूत झाले. २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवून ते आमदार झाले. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in