बिनविरोधच्या लाटेतही बावनकुळे लटकले! नागपुरात काँग्रेसशी थेट लढत

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विजयाचा मार्गही मोकळा झाला आहे.
बिनविरोधच्या लाटेतही बावनकुळे लटकले! नागपुरात काँग्रेसशी थेट लढत
Chandrashekhar Bawankule Sarkarnama

नागपूर : राज्यातील विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध करण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि शिवेसेनेच्या नेत्यांची सकाळपासून धावपळ सुरू होती. मुंबईतील दोन जागा बिनविरोध झाल्यानंतर गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अर्ज भाजपच्या उमेदवाराने मागे घेतला आहे. त्यानंतर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकही बिनविरोध होणार, अशी चर्चा होती. पण काँग्रेसच्या उमेदवाराने माघार न घेतल्याने भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बानवकुळे (Chandrashekhar Bawankule) दिलासा मिळालेला नाही.

अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत होती. महाराष्ट्रात मुंबई येथे दोन जागा बिनविरोध झाल्यानंतर नागपूरच्या जागेकडे राज्याचे लक्ष लागून होती. ही निवडणूक बिनविरोध होणार, अशी जोरदार चर्चा होती. भाजप आणि काँग्रेसमध्ये साटंलोटं झाल्याने भाजपच्या पदरात नागपूरची जागा पडेल, अशी शक्यता होती. शिवसेनेला दोन, भाजपला दोन आणि काँग्रेसला दोन जागा, असा समझोता झाल्याचे बोलले जात होते. पण मुंबईतील दोन, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार या चारच जागा बिनविरोध झाल्या आहेत.

Chandrashekhar Bawankule
अमरिश पटेल सलग चौथ्यांदा विधान परिषदेत; आघाडीच्या उमेदवाराची माघार

त्यामुळे नागपूरात चंद्रशेखर बानवकुळे विरूध्द काँग्रेसे उमेदवार छोटू भोयर असा सामना रंगणार आहे. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक डॉक्टर रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी मिळाली. भोयर यांच्या टर्नमुळे राजकीय विश्लेषकांनासुद्धा बुचकळ्यात टाकले आहे. छोटू राऊत यांना भाजपनेच काँग्रेसमध्ये पाठविले असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

Chandrashekhar Bawankule
मोठी बातमी : राज्यात भाजपचं सरकार कधी येणार? राणेंनी सांगितला मुहूर्त

बावनकुळे हे फडणवीस सरकारमध्ये उर्जामंत्री होते. पण 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. ते नाराज असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. पण बानवकुळे यांच्याकडून मागील दोन वर्षे सातत्याने महाविकास आघाडी सरकारविरोधात मोर्चा उघडला होता. त्यामुळे त्यांच्या गळ्यात विधान परिषेदची माळ पडल्याची चर्चा आहे. काँग्रेसने त्यांच्याविरोधात भोयर यांना उमेदवारी देत रंगत वाढवली आहे.

Chandrashekhar Bawankule
दिल्लीतून फोन येताच अमल महाडिकांची माघार अन् सतेज पाटील बिनविरोध

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही आज सकाळीच दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी राज्यातील विधान परिषदेच्या जागा बिनविरोध करण्याबाबात गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. या बैठकीत काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांना बिनविरोध विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा होती. पण त्यामध्ये नागपूरच्या जागेबाबत निर्णय होऊ शकला नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in