Thackeray vs. Shinde : ठाकरे - शिंदे गटात हाणामारी ; आमदार सरवणकरांनी गोळीबार केला ?

Thackeray vs. Shinde : दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे.
Eknath Shinde-uddhav thackeray
Eknath Shinde-uddhav thackeraySarkarnama

मुंबई : राज्यात जल्लोषात, आनंदात गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक (ganesh visarjan2022) पार पडली. पण प्रभादेवी येथील मिरवणुकीच्या वादाचे पडसाद शनिवारी रात्री उमटले.

प्रभादेवी (prabhadevi) परिसरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी सकाळी राडा झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही गटात मध्यरात्री हाणामारी झाली.

आत्तापर्यंत २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ जणांना ताब्यात घेतले आहे. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाच जणांना वैद्यकीय तपासणीसाठी दादर पोलिस घेऊन गेले आहेत.

शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी तक्रार दिली आहे. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या राड्यावेळी शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आमदार सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप केला जात आहे. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे.

शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात शनिवारी मध्यरात्री जोरदार राडा झाला. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांना मध्यरात्री दादरमध्ये मारहाण केली असल्याचा आरोप शिवसैनिकांनी करण्यात आला आहे. यावेळी झालेल्या गोळीबारातून एक पोलीस जखमी होता होता थोडक्यात वाचला, असा आरोप सुनील शिंदे यांनी केला आहे.

Eknath Shinde-uddhav thackeray
Ganesh Visarjan 2022 : 'म्याव म्याव' च्या घोषणाबाजीनं राजकारण तापलं ; ठाकरे-शिंदे गट आमने-सामने

ठाकरे-शिंदे गटातील कार्यकर्ते आमने-सामने आल्याने येथे काही काळ तणाव होता. आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी प्रभादेवी परिसरात सार्वजनिक मिरवणूक आली त्यावेळी शिंदे गटाचे समर्थक आमदार सदा सरवणकर यांचे सुपूत्र समाधान सरवणकर यांच्याकडून म्याव म्याव घोषणाबाजी करण्यात आल्याने वातावरण तापले.

यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते स्टेजवर आमनेसामने आल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.त्यानंतर शनिवारी मध्यरात्री दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची रस्त्यावर हाणामारी झाली, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी दावे-प्रतिदावे केले आहे. आमदार सरवणकरांनी आरोप फेटाळले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in