ठाकरे सरकार पडणार? : फाईल क्लिअर करण्यासाठी मंत्री अन् अधिकाऱ्यांची धावपळ

'सत्तांतर होणार' यामुळे फायलींवर सह्या घेणे, अर्ज निकाली काढणे आदी कामे गेल्या दोन दिवसात वाढली आहेत.
uddhav thackeray
uddhav thackeraysarkarnama

मुंबई :शिवसेनेत (shivsena) झालेल्या बंडखोरीमुळे राज्यात मोठ्या घडामोडी होत आहेत. महाविकास आघाडी सरकार पडणार,(thackeray government) अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या खात्यांच्या फाईल्स क्लिअर करण्यासाठी सध्या मंत्रालयात मंत्री आणि अधिकाऱ्यांची धावपळ वाढली आहे. (Eknath Shinde news update)

'सत्तांतर होणार' यामुळे सह्या घेणे, अर्ज निकाली काढणे आदी कामे गेल्या दोन दिवसात वाढली आहेत. कामांच्या मंजुरीसाठी टेबलांवर ढिगात फाइल्स पडून असल्याचे चित्र सध्या मंत्रालयात दिसत आहे.

uddhav thackeray
शिंदेंसाठी मी काय कमी केलं, ठाकरे, शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा : मुख्यमंत्री ठाकरे

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार धोक्‍यात आले आहे. हे सरकार लवकरच कोसळेल, या भीतीनं दोन दिवसापासून राज्यातील उद्योगपती, ठेकेदार, व्यावसायिक आपल्या फाईल्स क्लिअर करण्यासाठी मंत्रालय परिसरात तळ ठोकून असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

महत्त्वाच्या विषयांवरील मंत्रालयातील फाईल्स, महत्वाचे अर्ज याचे काम करून घेण्यासाठी अनेक जणांच्या मुंबईच्या वाऱ्या वाढल्या आहेत. अनेक महिन्यांपासून मंत्रालयात धूळ खात पडलेल्या फाईल्स कपाटातून शोधण्यासाठी अधिकारी आणि संबधीतांची धावपळ उडत आहे. यामुळे संबधीत विभागातील कर्मचाऱ्यांचे नेहमीपेक्षा काम वाढले आहे.

'मर्जी'च्या खात्यात बदली करुन घेतलेल्यांना चिंता

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर आपल्या 'मर्जी'च्या खात्यात बदली करुन घेतलेल्या कर्मचाऱ्यांचीही धावपळ वाढली आहे. ठाकरे सरकार कोसळले तर आपल्याला पुन्हा मुळच्या विभागात जावे लागेल, ही चिंता संबधीत कर्मचाऱ्यांना सतावत आहे.

अधिकाऱ्यांनी देव पाण्यात ठेवले

मंत्र्यांच्या कार्यालयांतील अधिकारी,कर्मचाऱ्यांचीही पुन्हा मूळ विभागात जावे लागू शकते म्हणून चिंता वाढली आहे. शिंदे-ठाकरेंच्या ब्रेकिंग न्यूजकडे या सर्वांचे लक्ष आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळू नये, म्हणून अनेक अधिकाऱ्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत.

कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला..

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार धोक्‍यात आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. यापार्श्‍वभूमीवर मंत्रालयात प्रस्तावांच्या फायलींवर सह्या होण्यासाठी संबंधितांनी तळ ठोकला आहे. सही होण्यासाठी कित्येक दिवस लागणार असताना सत्तांतर होणार असल्याने मंत्रालयात सह्या घेणे, अर्ज निकाली काढणे, अशा कामांना गेल्या दोन दिवसांत मोठा वेग आला आहे. मंत्रालयातील कामांच्या मंजुरीसाठी टेबलांवर ढिगात फाईल्स पडून असल्याचे चित्र असतानाच आपल्या फाईल्स काढून त्यावर सही घेऊन ते फायनल करण्यासाठी संबंधीतांची धावपळ उडाली आहे. यातून प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताणही वाढला आहे.

ऑर्डर लवकर काढा

राज्यात विविध विभागात बदल्या करण्यासाठी लाँबिंग केले जाते, यासाठी 'कार्यरत' असलेले अधिकारी अन् काही लोकप्रतिनिधींची चिंता वाढली आहे. ऑर्डर लवकर काढण्यासाठी त्यांचे फोन खणखणत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com