Palghar Politics: ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; पंचायत समिती उपसभापतींवर जीवघेणा हल्ला...

Palghar Crime news| गहला हे अधिकाऱ्यांसह डहाणूतील विरे गावात जलजीवन मिशनच्या (jal jeevan mission) कामाच्या पाहणीसाठी गेले होते.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

Palghar News : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या पंचायत समिती उपसभापतींवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पिंटू गहला यांनी वानगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. (Internal factionalism in the Thackeray group ; Fatal attack on Panchayat Samiti Deputy Chairman)

मिळालेल्या माहितीनुसार, पिंटू गहला गुरुवारी (२७ एप्रिल) अधिकाऱ्यांसह डहाणूतील विरे गावात जलजीवन मिशनच्या (jal jeevan mission) कामाच्या पाहणीसाठी गेले होते. पण त्याच वेळी काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गहला यांना गंभीर दुखापत झाली डहाणूतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Palghar Political news)

Uddhav Thackeray
Jalgaon APMC Election: १२ कृषी उत्पन्न बाजार समितीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला,आघाडी विरुध्द युतीत चुरशीची लढत

ठाकरे गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य जयेंद्र दुबळा (zp member jayendra dubla, dahanu) यांनीच हा हल्ला केल्याचा आरोप गहला यांनी केला आहे. या प्रकरणी गहला यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दुबळा यांच्यासह काही जणांवर गर्दी जमवून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत. पालघर मधील ठाकरे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. (Crime News)

पिंटू गहला यांनी विरे गावातील जलजीवन मिशनअंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेल्या पाईपलाईनचे काम बंद पाडले होते. याच रागातून गुरुवारी (ता. २७) या कामाची पाहणी करण्याकरिता गहला आणि संबंधित अधिकारी पाणीपुरवठा अभियंता मनीष भामरे, सभापती प्रवीण गवळी, कनिष्ठ अभियंता कुशल पाटील विरे गावात गेले होते. पण याचवेळी गावातील दोनशे ते तीनशे लोकांच्या संतप्त जमावाने पिंटू गहला यांची गाडी अडवून हल्ला केला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com