बनावट जातप्रमाणपत्र प्रकरण : राणांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Navneet Rana | मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा याचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता.
Navneet Rana Latest News in Marathi
Navneet Rana Latest News in Marathisarkarnama

Navneet Rana मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्रा प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा याचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर आज या प्रकरणी सुनावणी होणार आहे. गेल्या दिवसापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहे.

नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत. वरिष्ठ वकील रिजवान मर्चंट यांच्यामार्फत त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Navneet Rana Latest News in Marathi
मोठी बातमी ! ठाकरे, राऊत, देशमुखांवरील 'त्या' सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या...

अमरावतीचे शिवसेनेचे माजी खासदार व आता शिंदे गटात गेलेले आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणांच्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत आक्षेप घेणारी याचिका 2017 साली उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी आपल्या निवडणूक अर्जासोबतच्या शपथपत्रात अनुसूचित जमातीचे जोडलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप त्यांनी केला होता. राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटा असल्याचा दावा त्यांनी केला आहे, यानंतरच उच्च न्यायालयाने राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द केले होते.

उच्च न्यायालयाच्या कारवाई नंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. 22 जून 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राणा यांना दिलासा दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला यावेळी स्थगिती देण्यात आली होती. आता खटला लवकरात लवकर निकाली काढण्याकरिता सत्र न्यायालयात याचिका राणांच्या वकीलांडून दाखल करण्यात आले आहे. आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com