जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा: मुख्यमंत्र्यांच्या टीकेला फडणवीस उत्तर देणार

CM Uddhav Thackeray| Devendra Fadanvis| मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेनंतर आज फडणवीस सभा घेणार आहे.
जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा: मुख्यमंत्र्यांच्या टीकेला फडणवीस उत्तर देणार
CM Uddhav Thackeray| Devendra Fadanvis|

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी (14 मे) मुंबईत झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आज (15 मे) देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेत केलेल्या टीका फडणवीसांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आजच्या सभेत फडणवीस काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काल झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजप नेते आणि राणा दांपत्यांवर सडकून टीका केली. आता मुख्यमंत्र्यांच्या टीकेला फडणवीस याला काय उत्तर देतात, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. याआधी 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुंबईच्या सौमय्या मैदानात झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर (Shivsena) सडकून टीका केली होती.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कालच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये फडणवीस म्हणाले, सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम...अरे छट हा तर निघाला... आणखी एक टोमणे बॉम्ब...जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा! अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कालच्य सभेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी मनसे, एमआयएम नेते अकबरुद्दीन औवेसी, तसेच राणा दांपत्यावर निशाणा साधला.

''आमच्यासोबत जी गाढवं होती, अगदी घोड्याच्या आवेशात. त्या गाढवाला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो आहोत. आमचे हिंदुत्व म्हणजे देवळात घंटा बडविणारे नाहीतर अतिरेक्यांना तुडविणारे आहे. ज्यांनी घंटा बुडविल्या त्यांना काय मिळालं घंटा? ज्यांना महाराष्ट्र काय आहे हे कळलं नाही त्यांच्यासाठी बोलावे लागत आहे. खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेले पक्ष आपल्या सोबत होता. तो देशाची दिशा बदलत आहे,'' अशी घणाघाती टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.