फडणवीस नाराज? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही दोघे म्हणजे, दो दिल एक जान...

CM Eknath Shinde| Devendra Fadanvis | शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील आमदार वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत.
CM Eknath Shinde| Devendra Fadanvis |
CM Eknath Shinde| Devendra Fadanvis |

मुंबई : मुंबईतील प्रभादेवी येथे दोन दिवसांपूर्वी शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या वादादरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारातच हवेत गोळीबार केला असल्याचा आरोप शिवसेना (Shivsena) आमदारांकडून करण्यात आला. या गोळीबार प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

पैठणची सभा पार पडल्यानंतर त्यांनी माध्यामांशी संवाद साधताना या विषयावर त्यांनी भाष्य केलं आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या नाराजीबाबत भाष्य करत या सर्व चर्चांना पुर्णविराम दिला आहे. देवेंद्र फडणवीस आणि मी, दो दिल एक जान आहोत, एकसे भले दोन आहोत. एवढंच लक्षात ठेवा. फडणवीसांना पाच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आदेश त्यांनी मानला हे एक मोठे उदाहरण आहे. अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी फडणवीसांचे कौतुकही केले.

CM Eknath Shinde| Devendra Fadanvis |
राष्ट्रवादीला खिंडार; अर्धा डझन नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर ?

शिंदे गट आणि शिवसेनेतील धुसफुस दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील आमदार वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. त्यातचप्रभादेवी परिसरात दोन दिवसांपूर्वी दोन्ही गटात मोठा वाद झाला. वादाचे रुपांतर शेवटी मारहाणी पर्यंत पोहचले. पोलीस स्टेशनच्या आवारातच शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदारांनी केला.

या प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेऊन नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. या भेटीत फडणवीसांनी दोन्ही गटातील वादावर चर्चा केल्याचेही बोलले जाते. पण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर अखेर या चर्चांवर पडदा पडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in